दोघांचा अपघातात मृत्यू

By admin | Published: March 10, 2017 01:33 AM2017-03-10T01:33:35+5:302017-03-10T01:33:49+5:30

सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळ डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला धडक दिल्याने यात वीरगाव येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला

Both died in an accident | दोघांचा अपघातात मृत्यू

दोघांचा अपघातात मृत्यू

Next

 सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळील हॉटेल साईगार्डन समोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला भीषण धडक दिल्याने यात वीरगाव(ता. बागलाण) येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.अंतापुर येथून कंदोरी कार्यक्र म आटोपून परत येत असतांना गुरु वारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीरगाव परिसरावर यामुळे शोककळा पसरली आहे.
वीरगाव येथील हरीभाऊ शिवराम गांगुर्डे (६५) व पवन शिवानंद मोरे (३०) हे सकाळी अंतापुर येथे कंदोरीच्या कार्यक्रमासाठी मोटर सायकलीने गेले होते. कार्यक्र म आटोपुन दुपारी घराकडे परतत असतांना ताहाराबाद या गावाजवळ असलेल्या हॉटेल साई गार्डनसमोर या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या टँकर(एम.एच.३९ सी २४२२) ने भीषण धडक दिली. यात मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर पवन मोरे व हरी गांगुर्डे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दु:खापत झाली. परिसरातील नागरिकांनी या दोघांना तात्काळ रु ग्णवाहिकेद्वारे सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. हरी गांगुर्डे हे वीरगाव येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर पवन हा अविवाहित आहे. यानंतर संपूर्ण परिवाराची धुरा पवन संभाळत असतांनाच पवनच्या अपघाती जाण्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून आले आहे.
जायखेडा येथील पोलिस ठाण्यात सदर वाहनाविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजियसंग ठाकुर करीत असून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनास ताब्यात घेतले आहे. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वीरगाव येथे दोन्हीही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापारी वर्गाने आपले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. (वार्ताहर)

Web Title: Both died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.