२१ लाखांची रोकड असलेली बॅग पळविणारे दोघे गुजरातमधून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 02:07 PM2019-07-08T14:07:39+5:302019-07-08T14:08:03+5:30
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने अहमदाबाद येथे जाऊन संशियत आरोपी मुन्ना इंद्रेकर (५०), व रवि इंद्रेकर या दोघांना अटक केली आहे.
नाशिक : दहा दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव स्टॅन्ड येथील चिंचबनात एका कारची काच फोडून सुमारे २१ लाख ५० हजार रु पयांची रोकड लूटून पोबारा करणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद येथून ताब्यात घेतले.
रविवार कारंजा येथील धूत ट्रेडर्स दुकानाचे व्यापारी सुयोग धूत हे (दि.२८) जून रोजी मालेगाव स्टॅन्ड येथून घराकडे चारचाकीने (एम एच १५ जीएल ११८) जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशियतांनी दुचाकीला कट का मारला, या कारणावरून कुरापत काढून धूत यांच्याशी वाद घातला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अन्य दोघांनी कारची काच फोडून २१ लाख ५० हजार रु पयांची रोकड असलेली कारमधील बॅग घेऊन धूम ठोकली होती. या घटनेनंतर गुन्हेशाखा व पंचवटी पोलीस समांतर तपास करत होते. गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने अहमदाबाद येथे जाऊन संशियत आरोपी मुन्ना इंद्रेकर (५०), व रवि इंद्रेकर या दोघांना अटक केली आहे.