रिक्षातून मुद्देमाल लंपास करणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:45 AM2019-06-18T00:45:04+5:302019-06-18T00:45:19+5:30
रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या सहप्रवासी महिलांची नजर चुकवून त्यांचे मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
नाशिक : रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या सहप्रवासी महिलांची नजर चुकवून त्यांचे मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
दिलीप तुळशीराम हंबिले (३२) रा. अमृतधाम, पंचवटी व रामेश्वर शंकर कुमावत (३०) रा. साईबाबानगर, जेलरोड अशी या दोघांची नावे आहेत. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार विश्वास बागुल व अन्य कर्मचारी गस्त घालत असताना दोघेही भामटे संशयास्पद फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, मार्च महिन्यात म्हसरूळच्या ओंकारनगर येथे एका घराचे कुलूूप तोडून आतील सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले होते.
तसेच गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्यादरम्यान रिक्षातून प्रवास करताना दोघा महिलांच्या बॅगेतून न कळत सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या दोघांकडून अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.