वणी जवळील अपघातात दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 11:50 PM2022-02-19T23:50:30+5:302022-02-19T23:53:23+5:30

दिंडोरी : वणी-कळवण रस्त्यावरील बोरीचापाडा नजीक भरधाव पिकअपने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत भातोडे येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहे.

Both were killed on the spot in an accident near Wani | वणी जवळील अपघातात दोघे जागीच ठार

राहुल नामदेव चहाळे

Next
ठळक मुद्दे भरधाव पिकअपने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

दिंडोरी : वणी-कळवण रस्त्यावरील बोरीचापाडा नजीक भरधाव पिकअपने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत भातोडे येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहे.
वणी शिवारातील बोरीचापाडा येथील बालाजी नर्सरीसमोर शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान नांदुरी बाजूकडून टोमॅटो भरून वणीकडे भरधाव वेगाने येणारी पिकअप (एमएच १७ बीडी ५८१८) हिने वणी बाजूकडून चंडीकापूर बाजूकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वार सागर धनराज बागुल (२२) व राहुल नामदेव चहाळे (१८) दोघे रा. भातोडे, ता. दिंडोरी हे जागीच ठार झाले.
पिकअपची धडक इतकी भयानक होती की मोटारसायकल व दोघाही तरुणांचा चेंदामेंदासदृश स्थिती होती. धडक दिल्यानंतर पिकअपही रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन पिकअपमधील टोमॅटो रस्त्यावर सर्वत्र पसरून टोमॅटोंचा रस्त्यावर चिखल झाला होता. घटनेनंतर स्थानिक व पोलिसांनी धाव घेत छिन्नविच्छिन्न मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.
घटनेची खबर भातोडे येथे कळताच ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत पिकअप चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी व वणीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची समज काढून वातावरण शांत केले. दरम्यान, रात्री उशिरा पिकअप चालकावर वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत तरुण दोघेही शेतमजूर व घरातील कर्ते होते.
 

Web Title: Both were killed on the spot in an accident near Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.