कोविड सेंटरच्या मागे मद्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:06 AM2021-04-27T00:06:39+5:302021-04-27T00:07:00+5:30

सुरगाणा : येथील कोविड रुग्णालयाच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरल्याने, उपचार घेत असलेल्या रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्यादेखील आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bottles of liquor behind the Covid Center | कोविड सेंटरच्या मागे मद्याच्या बाटल्या

कोविड सेंटरच्या मागे मद्याच्या बाटल्या

Next
ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य : रुग्णांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

सुरगाणा : येथील कोविड रुग्णालयाच्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य पसरल्याने, उपचार घेत असलेल्या रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्यादेखील आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुलांचे शासकीय वसतिगृहात कोविड सेंटर उभारण्यात आले असून, येथील प्रशस्त इमारतीत सुरगाणा शहरासह तालुक्यातील बाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र इमारतीच्या पाठीमागे मद्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, प्लास्टिक पिशव्या आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे रुग्ण, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदींचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोविड रुग्णालयाचा परिसर आतून व बाहेरून स्वच्छ ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या कोविड सेंटरमध्ये २२ हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच स्वॅब देण्यासाठी व चाचणी अहवाल घेण्यासाठी येथे येणाऱ्यांची वर्दळ असते. स्वच्छता कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णालय व परिसराची नियमित स्वच्छता होत नसल्याचे सांगितले जाते.
सुरगाणा कोविड रुग्णालयाच्या मागील बाजूस मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक, इतर कचरा यांचा पसारा वाढला आहे. यामुळे दुर्गंधी पसरून रुग्णांचे व येथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुळातच याठिकाणी असा कचरा साचलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(२६ सुरगाणा १,२)

सुरगाणा येथील कोविड सेंटरच्या पाठीमागील बाजूस पसरलेला कचरा.

Web Title: Bottles of liquor behind the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.