नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:56 PM2018-12-09T22:56:28+5:302018-12-09T22:57:02+5:30
नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.
नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने पाऊल उचलले असून, नव्याने सीमांकन करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. याबाबतचा आराखडा व प्रस्ताव राज्य वन्यजीव महामंडळाला सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्णातील निफाड तालुक्यामध्ये गोदावरी-कादवा नदीच्या संगमावार नांदूरमधमेश्वर बंधारा इंग्रजकाळात बांधला गेला. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला पाणथळ जागा विकसित झाली. पाणथळ जागेतील नैसर्गिक जैवविविधतेने हा परिसर समृद्ध झाला.
नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सीमांकनाचा मुख्य मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अभयारण्याची सीमा निश्चित होईल, जेणेकरून संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण होणाºया अडचणींवर मात करणे वन्यजीव विभागाला शक्य होणार आहे. सीमांकन निश्चित झाल्यानंतर नैसर्गिक अधिवास विकसित करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.
स्थानिक गावकºयांमधील संभ्रम दूर होऊन लोकसहभागातून अभयारण्याच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर करता येईल, असा विश्वासही उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी व्यक्त केला आहे.सीमांकनाचा तोटा स्थानिक नागरिकांसह अभयारण्याला संवर्धनाच्या बाबतीतही आहे. भविष्यात या अभयारण्याच्या संरक्षणासाठी सीमानिश्चिती करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने वन्यजीव विभागाने आराखडा तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितीत असलेल्या राज्य वन्यजीव मंडळाकडे सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.