रुग्णालयांवरील कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:00+5:302021-01-13T04:34:00+5:30

गोदा प्रदूषणाकडेही झाले दुर्लक्ष नाशिक: गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत. महापालिकेनेदेखील येथे सुरक्षा रक्षक नेमले ...

Bouquet of action on hospitals | रुग्णालयांवरील कारवाई गुलदस्त्यात

रुग्णालयांवरील कारवाई गुलदस्त्यात

Next

गोदा प्रदूषणाकडेही झाले दुर्लक्ष

नाशिक: गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत. महापालिकेनेदेखील येथे सुरक्षा रक्षक नेमले होते; परंतु गोदावरीत प्रदूषण करण्याचे प्रकार अजूनही सुरूच असून याप्रकरणी कोणतीही कारवाई हेाताना दिसत नाही. सध्या नदीला पाणी असल्याने वाहने आणि कपडे धुणारे नदीकाठावर दिसून येत असताना त्यांना विचारना होताना दिसत नाही.

पावसामुळे रस्त्यांवर पडले खड्डे

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे वाहनधारकांनादेखील वाहन चालविताना अडचण निर्माण होत आहे. विशेषत: सर्व्हिस रोड तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते.

यंदा पतंगाची दुकाने कमी

नाशिक: नायलॉन मांजामुळे पक्षी तसेच मानवालादेखील धोका निर्माण झाल्याने नायलॉन मांजाविरोधात प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. मांजाचा धोका लक्षात घेऊन पालक आणि दुकानदारदेखील सजग झाल्याने अनेकांनी धोकादायक पतंगबाजी करण्याचे टाळले आहे. त्यामुळे यंदा बाजारात पतंगाची दुकाने कमी झाल्याचे दिसते.

सखल भागात साचले पावसाचे पाणी

नाशिक : शहरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे अनेक रहिवासी क्षेत्रात पावसाचे पाणी साचले आहे. विशेषत: पाथर्डी फाटा येथील अनेक सोसायट्यांच्या रस्त्यावर तसेच मोकळ्या भूखंडावर पावसाचे पाणी साचले आहे. याबाबत महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नाशिकरोड परिसरात गढूळ पाणी

नाशिक : मागील आठवड्यापासून नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मातीमिश्रित पाणीपुरवठा तसेच पाण्याला दुर्गंधी येत असल्याचीसुद्धा नागरिकांची तक्रार आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचे ही नागरिकांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकरी चिंतित

नाशिक : वकाळी पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. द्राक्षबागा तसेच कांदा लागवड क्षेत्रात पाणी साठल्याने शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. द्राक्ष पीक वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, शेतात पाणी साठल्याने लागवडीचे कामकाजही थांबले आहे. येथील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली आहे.

मुक्त विद्यापीठ रस्त्याची दुर्दशा

नाशिक : गंगापूर गावातून मुक्त विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणेदेखील कठीण झाले आहे. हा रस्ता कुणी दुरुस्त करावा, याबाबत संभ्रमावस्था असल्याने रस्त्याचे काम पडून आहे. जिल्हा परिषद तसेच बांधकाम विभाग हे दोघेही जबाबादारी घेत नसल्याचे बोलेले जाते.

अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव

नाशिक: शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात विजेचा लपंडाव होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पाऊस सुरू होताच रहिवासी क्षेत्रातील विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वादळ वारा नसतानाही केवळ पावसाच्या सरींनी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

दुचाकीवरील ट्रिपल सीट चालक सुसाट

नाशिक : गजबजलेल्या मुख्य रस्त्यांवरून अनेक टवाळखोर ट्रिपल सीट दुचाकी चालवित असताना पोलिसांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शहरातील गंजमाळ, त्र्यंबक नाका तसेच गडकरी चौक सिग्नल येथून असे तरुण ट्रिपल सीट दुचाकी चालवित असताना त्यांना अडविले जात नसल्याचे दिसते. सारडा सर्कल येथूनही विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी होत आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे अडथळा

नाशिक : नाशिकारेड येथील मशीद रस्ता, जुूनी स्टेट बँक तसेच वास्को चौकात रस्त्याच्या कडेला दुकानदारांनी दुकाने थाटली असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हातगाडीवरील विक्रेते तसेच भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापल्याने अंतर्गत रस्त्यावर कोंडी वाढली आहे. येथील रस्ता मोकळा करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Bouquet of action on hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.