पाटी-पेन्सील हाती धरण्याच्या वयात भीक मागण्यासाठी कटोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:21+5:302021-09-08T04:19:21+5:30

नाशिक : खेळण्या- बागडण्याच्या वयात आणि पाटी-पेन्सिल हाती घेण्याच्या काळात चिमुकल्यांच्या हाती भिकेसाठी कटोरी येते आणि आयुष्याचा प्रवास एका ...

Bowl for begging at the age of holding a pencil! | पाटी-पेन्सील हाती धरण्याच्या वयात भीक मागण्यासाठी कटोरी!

पाटी-पेन्सील हाती धरण्याच्या वयात भीक मागण्यासाठी कटोरी!

Next

नाशिक : खेळण्या- बागडण्याच्या वयात आणि पाटी-पेन्सिल हाती घेण्याच्या काळात चिमुकल्यांच्या हाती भिकेसाठी कटोरी येते आणि आयुष्याचा प्रवास एका अंधकाराच्या दिशेने सुरू होतो. सिग्नलवरील चौकात भीक मागणाऱ्या मुलांकडे पाहिले, तर कोमजलेले हे बालपण कधीतरी खुलू शकेल का? असाच प्रश्न अनेकांच्या मनात येताे. जीवनाचे जळजळीत वास्तव रोजच शहरातील चौकाचौकांत दिसते. कोण कुठली ही बालके, त्यांचे पुढे काय होणार, हा प्रश्न घेऊन नागरिक रोजच पुढे जातात.

नाशिक शहरामध्ये जवळपास प्रत्येक चौकात अशा प्रकारची मुले दिसतात. भीक मागणाऱ्या या निरागस मुलांकडून भीक मागवून घेतली जात असल्याचे सहज लक्षात येते. पाच- दहा रुपये हाती येताच ही मुले पळत जाऊन त्यांच्या आई- वडिलांच्या हातात ठेवतात आणि पुन्हा भीग मागण्यासाठी गाड्यांच्या मागे धावतात.

--इन्फो--

त्र्यंबक नाका सिग्नल चौक

शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या त्र्यंबक नाका सिग्नलवर रोजच अशा प्रकारची मुले दिसतात. सिग्नलवर गाड्या थांबल्या की, त्यांच्याकडे पैसे किंवा खाऊ मागणाऱ्या या मुलांचे साधारण वय अगदी तीन वर्षांपासून ते दहा बारा वर्षांपर्यंत आहे. बालकांच्या कडेवर बारा-बंधरा महिन्यांचे बाळदेखील असते.

आयटीआय सिग्नल

सातपूर मार्गावरील आयटीआय सिग्नलवरही अनेकदा भीक मागणारी मुले दिसतात. काही मुले भीक मागतात, तर काही मुले काहीतरी वस्तू विकतानाही दिसतात. गॅबेज बॅग विकणारी मुले, तर जवळपास प्रत्येक सिग्नलवर दिसतात. त्यांच्या आई-वडिलांनी सांगितले म्हणून ते पिशव्या विकतात की कुणी त्यांच्याकडून काम करवून घेते, हा संशोधनाचा विषय आहे.

--इन्फो-

बालहक्क कोण मिळवून देणार

बालकांच्या हक्कांसाठीचे कायदे असले तरी त्यामधील गुंतागुंतीमुळे काही पेच निर्माण होतात. त्यामुळे बाल हक्कांचे संरक्षण करण्याचीदेखील अडचण येते. अशा मुलांना भिकेला लावले हे सिद्ध करणे कठीण जाते. याशिवाय या मुलांची यातून सुटका कारयची झाली तरी अशी मुले शक्यतो निवारागृहात, भिक्षाकरी प्रतिबंधात्मक गृहात राहण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांना नाइलाजाने पुन्हा आई-वडिलांच्याच हवाली केले जाते. सामाजिक संस्था यांचे काम मात्र यात प्रभावी ठरते.

070921\07nsk_24_07092021_13.jpg

सिग्नलवर भीक मागणारी मुले, चेहरा ब्लर करावा.

Web Title: Bowl for begging at the age of holding a pencil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.