चिनी वस्तूंवर बहिष्कार; स्वदेशीचे महत्त्व सांगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:08 AM2020-06-19T00:08:04+5:302020-06-19T00:27:58+5:30

नाशिक : कायम भारताविरुद्ध भूमिका घेणाºया चीनविरोधात नाशिकमधील उद्योजक, व्यापाºयांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांनी एकत्रित भूमिका घेत चिनी वस्तूंवर बहिष्कार ...

Boycott on Chinese goods; Explain the importance of Swadeshi | चिनी वस्तूंवर बहिष्कार; स्वदेशीचे महत्त्व सांगणार

चिनी वस्तूंवर बहिष्कार; स्वदेशीचे महत्त्व सांगणार

googlenewsNext
ठळक मुद्देखेळणी, स्टेशनरीही नकोच : ग्राहकांच्या जनजागृतीसाठी व्यावसायिक संघटना सरसावल्या

नाशिक : कायम भारताविरुद्ध भूमिका घेणाºया चीनविरोधातनाशिकमधील उद्योजक, व्यापाºयांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांनी एकत्रित भूमिका घेत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या चळवळीत सहभागी होत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याची गरज असल्याने महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्ससह विविध व्यावसायिक संघटना जनजागृती करण्यासाठी सरसावल्या आहेत.
भारताविरोधी भूमिका घेण्यासोबतच भारत-चीन सीमेवरील गवलान खोºयात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रे त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाभरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक इलेक्ट्रॉनिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम घंटे यांनी दिली. तसेच आम्ही भारतीय सैनिकांसोबत असल्याचेही घंटे यांनी सांगितले.

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभियान सुरू
उद्योजक व्यापारीवर्गासह विविध सामाजिक संघटनांक डून सोशल मीडियावर ‘भारतीय सामान-हमारा अभियान’ या चळवळीची सुरुवात करण्यात आली आहे. चीनमधून भारत प्रामुख्याने चार स्वरूपाच्या वस्तू आयात करतो. यात तयार उत्पादने, कच्चा माल, सुटे भाग तसेच तांत्रिक उत्पादनांचा समावेश आहे. यातील चीनमधून येणाऱ्या तयार मालावर बहिष्कार घालण्यासोबतच व्यापाऱ्यांनी भारतीय उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४उद्योजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिनी खेळणी आणि स्टेशनरीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्धार सामान्य नागरिक ांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Boycott on Chinese goods; Explain the importance of Swadeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.