सभेवर बहिष्कार : अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप व्ही. एन. नाईक संस्थेची सभा वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:24 AM2017-12-24T00:24:10+5:302017-12-24T00:27:57+5:30
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी होणारी सर्वसाधारण सभा वादात सापडली असून, सभेची माहिती दडवून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी होणारी सर्वसाधारण सभा वादात सापडली असून, सभेची माहिती दडवून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रल्हाद पाटील कराड, एन. एम. आव्हाड, तुकाराम दिघोळे, अॅड. का. का. घुगे या सभासदांनी या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्या संस्थेची वार्षिक सभा दि. २४ रोजी दुपारी २ वाजता असल्याचे समजले असून, सदर सभेची नोटीस जास्त खपाच्या वर्तमानपत्रात न देता दुसºया वर्तमानपत्रात देण्याबाबतचा संस्थेचा उद्देश समजला नाही. संस्थेचे कामकाजाबाबत सध्याचे संचालक मंडळ, पदाधिकारी यांनी कोणताही समन्वय किंवा सहविचार आजपावेतो पाळलेला नाही. तसेच संस्थेच्या कार्यक्रमात समाजातील लोकांना सहभागी करून घेतले जात नाही, संस्थेचे पदाधिकारी अहंकार व अहंगडांचे प्रदर्शन करून मर्यादा सोडून बोलतात याचे आम्हाला शल्य आहे. संस्थेच्या यशाचे सारे श्रेय स्वत:कडे खेचून घेण्याचा पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याबद्दल पत्रात दु:ख व्यक्तकरण्यात आले अ सून, अशा परिस्थितीत आम्ही वार्षिक सभेस उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे सभा तहकूब करावी किंवा नाही तर आमचा सर्वांचा वार्षिक सभेवर बहिष्कार आहे असे समजावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी विद्यमान संचालकमंडळावर दाखविलेल्या या अविश्वासामुळे रविवारी होणारी सभा गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विनियोग केला नसल्याचा आरोप संस्थेच्या वार्षिक अहवालात दिलेल्या जमाखर्चाचा ताळमेळ दिसत नाही, तसेच जागेच्या मिळालेल्या पैशांचा जमा खर्च व्यवस्थित नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असून, कबड्डी प्रीमिअर लिगच्या खर्चाबाबत मजकूर आहे, परंतु प्रायोजक व पैसे जमा झाल्याचा उल्लेख नाही. कार्यकारी मंडळाच्या काळामध्ये कोणतीही महत्त्वाची कामे नजरेत भरतील असे झालेले नाही, उलट संस्थेची सर्व्हे नंबर ७१७/१अ ही मिळकत विकून जे पैसे मिळाले त्याचा विनियोग सुद्धा व्यवस्थित केलेला नसल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.