नगरपालिका सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:15 AM2018-02-24T00:15:15+5:302018-02-24T00:15:15+5:30

येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.

Boycott at municipal council | नगरपालिका सभेवर बहिष्कार

नगरपालिका सभेवर बहिष्कार

Next

येवला : येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.  पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी, सेना, अपक्ष यांच्यासह घरचा आहेर देणाºया दोन भाजपा नगरसेवकांसह तब्बल २१ नगरसेवकांनी पालिकेद्वारा कोणतीच जनविकासाची कामे होत नसल्याचा थेट घणाघात करीत भाजपाचा नगराध्यक्ष असूनही गेल्या दीड वर्षात निधी अभावी कोणतेही काम होत नाही. यामुळे सभेचा अजेंडा वाचण्यापूर्वीच विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. पालिकेसमोर २१ नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले. पालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी कामाबाबत हतबलता दाखविल्याने २१ नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांना दिले.  सभेमध्ये जनतेची कामे होत नाहीत, त्यात सर्व नगरसेवकांनी मग ते सत्ताधारी असो वा विरोधक यांची कामे होत नाही यावर खडाजंगी झाली. राष्ट्रवादी गटनेता डॉ. संकेत शिंदे, अपक्ष गटनेता रूपेश लोणारी, सेनेचे गटनेते दयानंद जावळे यांनी सभागृहात जनहिताची कामे व्हावीत यासाठी आग्रह धरीत सभात्याग करून पालिकेबाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये भाजपाचे दोन नगरसेवक सामील झाल्याने शहरामध्ये चर्चा सुरू झाली आहे. संतप्त नगरसेवकांनी आमची कामे होत नाही, आपले नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात असूनही येवल्यासाठी का निधी उपलब्ध होत नाही, नगराध्यक्ष नेमके करता काय, असा सवाल केला. सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकीत राष्ट्रवादी, अपक्ष यांचे सर्व नगरसेवकांसह भाजपाचे गणेश शिंदे, पुष्पा गायकवाड तर शिवसेनेच्या सरोजिनी वखारे यांनी सभात्याग केला. सभात्यागानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे धरीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घोषणाबाजी व निषेध व्यक्त केला.
धरणे आंदोलनात सहभागी नगरसेवक  या धरणे आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रवीण बनकर, निसार शेख, प्रा. शीतल शिंदे परविनबानो शेख, तेहसिन शेख, सबिया मोमीन, रईसाबानो शेख , नीता परदेशी, अपक्ष गटनेते नगरसेवक रूपेश लोणारी, सचिन मोरे, अमजद शेख, अपक्ष नगरसेवक पद्मा शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, शिनसेनेच्या नगरसेवक किरण जावळे, सरोजिनी वखारे यांनी सहभाग घेतला होता. तर जनतेच्या रोजच्याच प्रश्नाला उत्तरे देऊन कंटाळलेल्या भाजपाचे नगरसेवक गणेश शिंदे व पुष्पा गायकवाड यांनीही या धरणे आंदोलनात सहभागी होत भाजपाला घरचाच आहेर दिला.

Web Title: Boycott at municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक