प्रेयसीचा खून केल्याच्या संशयावरून प्रियकर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:09+5:302021-01-14T04:13:09+5:30
---इन्फो--- वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयत अर्चना ही नाशिकमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती, असे तिचे वडील सुरेश भोईर ...
---इन्फो---
वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी
मयत अर्चना ही नाशिकमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती, असे तिचे वडील सुरेश भोईर यांनी सांगितले. अर्चनाचा फोन मंगळवारपासून लागत नव्हता, त्यामुळे तिच्याबाबत चौकशी सुरू केली. तन्मय हा तिला त्रास देत होता, असे अर्चनाने सांगितल्याचे भोईर म्हणाले.
---इन्फो--
पहाटेच्या सुमारास खून झाल्याचा संशय
अर्चनाचा पहाटेच्या सुमारास खून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी हे पथकासह दाखल झाले. तत्काळ गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार हेदखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करीत मयत अर्चनाच्या आई-वडिलांशी संवाद साधत जबाब नोंदविला तसेच न्यायसहायक तंत्रज्ञाच्या चमूने खोलीतील विविध वस्तूंवरील ठसे संकलित केले. दरम्यान, अर्चनाचा खून नेमका कसा करण्यात आला? याचा उलगडा शवविच्छेदन अहवालावरून होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----
फोटो आर वर १३ मर्डर नावाने सेव्ह आहे :
कॅप्शन- संशयित प्रियकर तन्मय यास हॉटेलमधून ताब्यात घेताना पोलीस.