‘त्या’ प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:17 AM2021-01-16T04:17:45+5:302021-01-16T04:17:45+5:30
सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या २०३ क्रमांकाच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय हा प्रेयसी अर्चना सुरेश भोईरसोबत (२१ रा. ...
सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या २०३ क्रमांकाच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय हा प्रेयसी अर्चना सुरेश भोईरसोबत (२१ रा. कल्लाले मान, बोईसर) एका रात्रीसाठी मुक्कामी आला होता. बुधवारी दुपारी १२ वाजता हॉटेल व्यवस्थापनाने त्यास खोली सोडण्यासाठी (चेकआऊट) सांगितले असता त्याने पुढील एका रात्रीपर्यंत मुक्काम वाढवत असल्याचे व्यवस्थापनाला सांगितले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई,वडिलांसह अन्य नातेवाईक अचानकपणे हॉटेलमध्ये येऊन धडकले. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगार खडबडून जागे झाले आणि त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक-२०३च्या दिशेने धाव घेतली. तन्मय याने खोलीचा दरवाजा उघडला असता पलंगावर अर्चना मृतावस्थेत आढळून आली होती. अर्चना वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. प्रियकर तन्मय हा तिला भेटण्यासाठी मासवन येथून मंगळवारी शहरात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.