मुलाच्या पित्याने मुख्याध्यापकाला घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 12:19 AM2021-03-14T00:19:38+5:302021-03-14T00:20:39+5:30
नाशिकरोड : मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या पित्याने महापालिका शाळा क्रमांक ५०च्या मुख्याध्यापकाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकरोड : मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या पित्याने महापालिका शाळा क्रमांक ५०च्या मुख्याध्यापकाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयित पिता चरणजीत ग्रायविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापक संतोष वाळुंज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरेवाडी येथे असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ५० मध्ये चरणजीत आणि त्याचा मुलगा दोन ते अडीच वर्षापूर्वी शाळेत नाव दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी ग्राय याचा मुलगा हा शाळेत केवळ दहा ते पंधरा दिवस हजर राहिला होता. मात्र तोपर्यंत त्याचा दाखला शाळेला अगोदरच्या शाळेकडून प्राप्त झालेला नव्हता.
त्यानंतर चरणजीत हा त्याच्या मुलाला शाळेतून घेऊन गेला. त्यानंतर संबंधित इसम हा वारंवार शाळेत येऊन मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला देण्याचा आग्रह करू लागला. परंतु मुलाचा दाखला शाळेत उपलब्ध नसल्यामुळे तो नियमानुसार देता येणार नाही, असे वाळुंज हे त्याला सतत समाजावत होते.
मात्र चरणजीत याने संतप्त होत दाखला देत नसल्याचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी वाळुंज यांच्या डोक्यात हातातील स्टीलचा मारून डाव्या हाताच्या अंगठ्याला जोरदार चावा घेत जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.