चौगाव येथील मजुराच्या खूनप्रकरणी तरूणाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:47 PM2017-12-29T12:47:07+5:302017-12-29T12:47:37+5:30
सटाणा : शंभर रु पये उसनवार न दिल्याने बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मित्राचा दगडाने ठेचून खून करणाºया धुळे जिल्ह्यातील मोहदरी येथील तरूणाला मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.बेलेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले.
सटाणा : शंभर रु पये उसनवार न दिल्याने बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मित्राचा दगडाने ठेचून खून करणाºया धुळे जिल्ह्यातील मोहदरी येथील तरूणाला मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.बेलेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले. बागलाण तालुक्यातील चौगाव शिवारात आसरामाता मंदिराजवळ गेल्या १७ आॅगष्ट २०१४ रोजी नारायण दत्ता राहटे या मजुराने मित्र शेंड्या उर्फ मंगेश सुभाष मालचे (३०) राहणार मोहदरी तालुका साक्र ी ,जिल्हा धुळे याला शंभर रु पये उसनवार न दिल्याने दिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.या भांडणात शेंड्याने नारायणच्या डोक्यात दगड टाकून अक्षरश: ठेचून निघृण खून केला.याप्रकरणी नारायणची पत्नी लता राहटे हिने सटाणा पोलिसांत शेंड्याविरु द्ध तक्र ार दिल्याने त्यांच्याविरु द्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विनायक ढाकणे यांनी फरार शेंड्याला तत्काळ बेड्या ठोकून हत्येची उकल केली.सबळ पुरावे गोळा करून मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.शेंड्या न्यायालयीन कोठडीत असतांना खटला चालविण्यात आला.या खटल्यात एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले.यामध्ये सटाणा ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.आर.जाधव ,मृत्युपूर्वी नारायण सोबत शेंड्याला पाहणारा साक्षीदार समाधान पुजाराम माळी ,नारायणची मुलगी मनीषा यांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.शेंड्या विरु द्ध उलब्ध परिस्थितीजन्य पुरावे ,तसेच साक्षीदारांच्या साक्षी ,रासायनिक परीक्षण अहवाल आदी पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश बेलेकर यांनी शेंड्याला जन्मठेप आण िहजार रु पये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.