हजारो भाविकांची ब्रह्मगिरी परिक्रमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:54 PM2018-08-20T15:54:18+5:302018-08-20T15:56:49+5:30

त्र्यंबकेश्वर : श्रावण सरी अंगावर झेलत सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाच्याचरणी लिन झाले. अतिशय आनंदाने मंदीरात भगवान त्र्यंबकराजांचा जय भोलेनाथ बम बम भोले, भगवान त्र्यंबकराज की जय असा जयघोष करीत होते. कृतार्थ होउन शिवभक्तांनी दर्शन घेतले. सुमारे ५० हजार भाविकांनी ब्रह्मगिरीची परिक्रमा केली.

Brahmagiri Parikrama of thousands of devotees! | हजारो भाविकांची ब्रह्मगिरी परिक्रमा !

हजारो भाविकांची ब्रह्मगिरी परिक्रमा !

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : श्रावण सरी अंगावर झेलत सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाच्याचरणी लिन झाले. अतिशय आनंदाने मंदीरात भगवान त्र्यंबकराजांचा जय भोलेनाथ बम बम भोले, भगवान त्र्यंबकराज की जय असा जयघोष करीत होते. कृतार्थ होउन शिवभक्तांनी दर्शन घेतले. सुमारे ५० हजार भाविकांनी ब्रह्मगिरीची परिक्रमा केली. श्रावणातील दुसरा सोमवार ! रात्रीपासुनच भाविकांनी प्रदक्षिणेला जाण्यासाठी शहरात गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर मंदीर, कुशावर्त तिर्थ आदींसह ब्रम्हगिरीवर, गंगाद्वारवर भाविकांची मांदियाळी दिसून आली. कुशावर्तावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी दोन आठवड्यापुर्वीच स्वत: पाणी स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करु न पालिकेला त्वरित पाणी स्वच्छतेचे आदेश दिले होते. त्यामुळे दोन दिवसात कुशावर्ताचे पाणी उपसुन स्वच्छ पाणी भरण्यात आले होते. मंदिराची संपुर्ण दर्शन बारी भरु न बाहेर भरपावसात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एवढेच नव्हे तर देणगी दर्शनासाठी देखील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुस-या श्रावण सोमवारसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी रविवारी पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलीस होमगार्ड, महिला पोलीस याशिवाय स्थानिक पोलिसांचे संख्या बळ वेगळे.असा कडक बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्ताची जबाबदारी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संजय दराडे, अति.पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत सोनवणे आदींच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिवहन महामंडळातर्फेप्रत्येक मिनिटाला बस सोडली जात होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. उपजिल्हा रु ग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह वैद्यकीय अधिकारी स्टाफ तत्पर होता. पालिकेने स्वच्छतेची काळजी घेउन साफ सफाई ठेवली होती. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर यांच्यासह मुख्याधिकारी डॉ चेतना मानुरे केरु रे, आरोग्य सभापती विष्णु दोबाडे, आदी शहरात फिरत होते. तर त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त यांनी आदेश दिल्याप्रमाणे भाविकांशी कोणताही वाद न होता दर्शन व्यवस्था सुलभतेने होती. सर्व शांततेत व सुरळीत दुसरा श्रावण पार पडला. पुढील तिसरा श्रावण सोमवारी मात्र अफाट गर्दी होणार आहे. त्यावेळेस सर्वच यंत्रणांची कसोटी लागणार आहे.

 

Web Title: Brahmagiri Parikrama of thousands of devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक