प्रवाशांना सांगे ब्रह्मज्ञान; रेल्वे सुरक्षा बल मात्र कोरडे पाषाण..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:14 AM2018-06-01T01:14:04+5:302018-06-01T01:14:04+5:30
लासलगाव : येथील रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बल शासनाने मंजूर केले असून, रेल्वे रूळ ओलांडताना २९हून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लासलगाव : येथील रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बल शासनाने मंजूर केले असून, रेल्वे रूळ ओलांडताना २९हून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कृपया रेल्वेरूळ ओलांडू नका. ते धोक्याचे आहे. अशा अर्थाच्या उद्घोषणा करूनही प्रवाशांना लोकांना समज येत नसल्याचे लासलगाव रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईद्वारे स्पष्ट होत आहे. रेल्वेस्थानकांमध्ये एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना रेल्वे रूळ ओलांडणाºयांचे प्रमाण वाढले आहे.
स्थानकांदरम्यान रूळ ओलांडणाºया प्रवाशांना चाप लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे २९ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, ११ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक के.डी. मोरे, मनमाड यांचे मार्गदर्शनाखाली, महेश महाले, डी. के. तिवारी यांनी कारवाई केली.
लासलगाव रेल्वे स्टेशनवर सकाळी रेल्वे रूळ ओलांडताना २९ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असली तरी जे पोलीस कर्मचारी ही कारवाई करत होते तेच रूळ ओलांडतानाचे चित्र पहायला मिळाले आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगळा न्याय व पोलीस कर्मचाºयांना वेगळा न्याय असे का? याबाबत दिवसभर लासलगाव शहरात चर्चा सुरू होती.