ब्राह्मणगावी १६९ जणांनी घेतला नेत्रतपासणीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:17 AM2021-10-16T01:17:12+5:302021-10-16T01:17:38+5:30

ब्राह्मणगाव येथे भाऊसाहेब हिरे सहकारी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा १६९ जणांनी लाभ घेतला.

In Brahmangaon, 169 people took the benefit of eye examination | ब्राह्मणगावी १६९ जणांनी घेतला नेत्रतपासणीचा लाभ

ब्राह्मणगाव येथे भाऊसाहेब हिरे संस्थेत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन करताना आमदार दिलीप बोरसे, बाजार समिती संचालक श्रीधर कोठावदे, सरपंच किरण अहिरे, अशोक शिरोडे, हेमंत अहिरे, अतुल अहिरे, रूपाली कोठावदे आदी.

Next

ब्राह्मणगाव : येथे भाऊसाहेब हिरे सहकारी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा १६९ जणांनी लाभ घेतला.

सरपंच रामचंद्र कृष्णा कोठावदे यांच्या स्मरणार्थ व ए.एस.जी.आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीधर कोठावदे यांच्या हस्ते कोठावदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सरपंच किरण अहिरे, माजी सरपंच सुभाष अहिरे, संमको बँकेचे माजी चेअरमन रूपाली कोठावदे, आमदार दिलीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात ८७ पुरुष व ८२ महिलांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.

शिबिरातील नेत्रतपासणीसाठी आलेले डॉ. आर. वसंथ कुमार, डॉ. कैलास पिंगळे व सहकाऱ्यांचा सत्कार संमको बँकेच्या माजी चेअरमन रूपाली कोठावदे व श्री सत्यसाई सेवा मंडळाचे प्रमुख अभय अहिरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे, संमको बँकेचे चेअरमन कैलास येवला, सर्व संचालक, पतसंस्थेचे संस्थापक अशोक शिरोडे, माजी सरपंच हेमंत अहिरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, ग्रामपंचायत उपसरपंच बापू राज खरे, सदस्य विनोद अहिरे, विश्वास खरे, रत्नाकर अहिरे, भाऊसाहेब हिरे संस्थेचे चेअरमन रोहिणी अहिरे, मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: In Brahmangaon, 169 people took the benefit of eye examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.