ब्राह्मणगाव पुन्हा चार दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:33 PM2020-08-07T14:33:53+5:302020-08-07T14:34:27+5:30
ब्राह्मणगाव : कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णाची वाढ होत आहे ,त्यातच शासनाने आता थोडेफार उद्योग धंदे सुरू व्हावेत म्हणून सीमित वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे . गावातील नागरिकांचां निष्काळजीपणा पाहता सुरक्षा कारणास्तव ग्रामपंचायतीने शुक्रवार ते सोमवार चार दिवस पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद केले आहे.

शुक्रवार ते सोमवार गावातील किराणा, सलून, वर्कशॉप, सायकल दुकान, इतर अन्य व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू रहाणार आहेत. गाव चार दिवस बंद केल्याने गावातील वर्दळ कमी होण्यास मदत नक्कीच होत आहे. गेल्या मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, या चार महिन्यात गावाने वेळोवेळी बंद पाळल्याने अद्याप गावात संक्रमित रुग्ण आढळले नाहीत. पोजीतिव्ह फक्त एकच रुग्ण आढळ ला होता तेही मुंबई हून गावी आले होते मात्र त्यांनी स्वत: हुन काळजी घेतली म्हणून गाव पुन्हा सुरळीत झाले.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच सरला अहिरे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, राघो अहिरे, पोलीस पाटील वैशाली मालपाणी, ग्रामविकास अधिकारी एन एन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे, माधव पगार, अनिल खरे आदिंनी सहकार्य केले.