ब्राह्मणगाव पुन्हा चार दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:04 PM2020-08-07T23:04:23+5:302020-08-08T01:07:42+5:30
लॉकडाऊनमुळे बंद पडलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी शासनाने सीमित वेळेत का होईना उद्योगधंदे, दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
ब्राह्मणगाव : लॉकडाऊनमुळे बंद पडलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी शासनाने सीमित वेळेत का होईना उद्योगधंदे, दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस पुन्हा गाव बंदचा निर्णय घेतला असून, यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शुक्रवार ते सोमवार गावातील किराणा, सलून, वर्कशॉप, सायकल दुकान व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहाणार आहेत.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच सरला अहिरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, राघो अहिरे, पोलीसपाटील वैशाली मालपाणी, ग्रामविकास अधिकारी एन.एन. सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे, माधव पगार, अनिल खरे यांनी केले आहे. गाव चार दिवस बंद केल्याने गावातील वर्दळ कमी होण्यास मदत नक्कीच होत आहे. गेल्या मार्च ते जुलै या चार महिन्यांत गावाने वेळोवेळी बंद पाळल्याने गावात संक्रमित रुग्ण आढळले नाहीत. गावात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता तोही मुंबईहून गावी आला होता. मात्र तोही आता ठणठणीत आहे.