ब्राह्मणगाव ग्रामपंचायत आता विजेसाठी स्वयंपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:11 AM2018-03-29T00:11:08+5:302018-03-29T00:11:08+5:30
येथे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत दोन लाख साठ हजार रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी विजेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या सोलर पॅनलमुळे ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वयंपूर्ण झाली असून, या सोलर संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य लता विलास बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्राह्मणगाव : येथे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत दोन लाख साठ हजार रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी विजेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या सोलर पॅनलमुळे ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वयंपूर्ण झाली असून, या सोलर संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य लता विलास बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या १० टक्के निधीतून अंगणवाडीतील लहान मुलांसाठी उत्तम पोषण आहार म्हणून गूळ शेंगदाण्याचे पाकीट प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे, सरपंच सरला अहिरे, मविप्र उपसभापती राघो अहिरे, भाजपाचे डॉ. विलास बच्छाव, सदस्य किरण अहिरे, विनोद अहिरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, उपसरपंच विठाबार्इं अहिरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अंगणवाडीत ग्रामपंचायतीच्या १० टक्के निधीतून महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन मशीनचे उद्घाटन सरपंच सरला अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील विविध मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, महिला कर्मचारी उपस्थित होते.