अवयवदानाविषयी समाजात तोकडी जागृती
By admin | Published: March 25, 2017 11:36 PM2017-03-25T23:36:50+5:302017-03-25T23:37:17+5:30
नाशिक : समाजात अवयवदानाविषयी अत्यंत तोकडी जागृती असून, व्यापक व प्रभावी जागृतीची अद्यापही गरज आहे. अवयवदान काळाची गरज असून, ही चळवळ उभी रहावी आणि यासाठी तरुणाईने पुढे येणे आवश्यक आहे,
नाशिक : समाजात अवयवदानाविषयी अत्यंत तोकडी जागृती असून, व्यापक व प्रभावी जागृतीची अद्यापही गरज आहे. अवयवदान काळाची गरज असून, ही चळवळ उभी रहावी आणि यासाठी तरुणाईने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अकराशे किलोमीटरची अवयवदान वारी करणारे सुनील देशपांडे यांनी केले. कुसुमाग्रज स्मारकात ‘संवाद’ संस्थेच्या वतीने ‘अवयवदान वारी : एक चळवळ’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देशपांडे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. भाऊसाहेब मोरे, रंजना देशपांडे, अभिमन्यू सूर्यवंशी उपस्थित होते. देशपांडे यांनी नाशिकच्या गाडगे मठापासून नागपूरमार्गे थेट आनंदवनपर्यंत अवयवदान जागृती पदयात्रा पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ प्रसंगाने दिली ऊर्जा
वारीला सुरुवात केल्यानंतर आरोग्य विद्यापीठात पहिला कार्यक्रम झाला. यावेळी एका बसमधून आलेल्या इंग्रजी शाळेच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी माझ्या हातात तब्बल १०५ पालकांचे अवयवदान संकल्पाचे अर्ज सोपविले. हा प्रसंग माझ्यासाठी स्फू र्तीदायक होता. यामुळे मला वारी पूर्ण करण्याची एक मानसिक ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.