मेंदू-कानाच्यामध्ये होती गाठ : इजिप्तच्या महिलेवर नाशकात यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 02:34 PM2019-03-05T14:34:52+5:302019-03-05T14:37:12+5:30

नाशिक : ‘ग्लोमस जुगीलर’ नावाची गाठ (ट्यूमर) कान आणि मेंदूमध्ये उद्भवतो. इजिप्त देशातील ‘कैरो’ शहराच्या निवासी असलेल्या हनीम अलसईद ...

The brain was in the ear: a successful operation in a woman on the Egyptian woman | मेंदू-कानाच्यामध्ये होती गाठ : इजिप्तच्या महिलेवर नाशकात यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदू-कानाच्यामध्ये होती गाठ : इजिप्तच्या महिलेवर नाशकात यशस्वी शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अ‍ॅकॉस्टिक न्यूरोमा’ नावाची शस्त्रक्रिया यशस्वीशस्त्रक्रियेनंतर या महिला रूग्ण पुर्णत: सामान्य शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व गुंतागुंतीची होती. त्यामुळे मोठे आव्हान

नाशिक: ‘ग्लोमस जुगीलर’ नावाची गाठ (ट्यूमर) कान आणि मेंदूमध्ये उद्भवतो. इजिप्त देशातील ‘कैरो’ शहराच्या निवासी असलेल्या हनीम अलसईद फर्क ही महिला या आजाराने मागील काही महिन्यांपासून त्रस्त होती. इजिप्तमधील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी या आजारावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली. या रूग्णाला अमेरिका व आॅस्ट्रेलियासारख्या देशांत जाण्याचा सल्ला दिला गेला; मात्र इजिप्तच्या एका डॉक्टर त्यांना नाशिकमध्ये असलेल्या कान-नाक घसा तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्या रूग्णालयात आठवडाभरापूर्वी ते दाखल झाले. मुंबईनाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर इंदोरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण चमूने अकरा तासांचे परिश्रम घेत गुंतागुंतीची व अत्यंत अवघड अशा जागेवर असलेलजया गाठीवर ‘अ‍ॅकॉस्टिक न्यूरोमा’ नावाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केल्याचे इंदोरवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे फर्क यांना अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या देशांत महागडे उपचार करणे शक्य नव्हते. दरम्यान, इंदोरवाला यांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या इजिप्तच्या डॉ.अन्वर यांच्या त्या संपर्कात आल्या. त्यांनी नाशिकचे इंदोरवाला यांचा पर्याय सुचिवला. फर्क या डॉ. इंदोरवाला यांच्या मुंबई नाका परिसरातील रु ग्णालयात उपचारासाठी मागील आठवड्यात दाखल झाल्या. अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड समजली जाणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इंदोरवाला व त्यांच्या चमूला तब्बल ११ तास लागल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शस्त्रक्रियेनंतर या महिला रूग्ण पुर्णत: सामान्य असून ते दोन दिवसांत इजिप्त या मायदेशी आनंदाने परतणार आहे.
परदेशातील डॉक्टर, रूग्णांचा विश्वास सार्थ ठरविला आणि सांघिक प्रयत्नाने आलेले यश महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी इच्छाशक्ती व कौशल्याच्या अधारे आपल्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर रूग्णसेवा करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतल्यास यश नक्की मिळते. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व गुंतागुंतीची होती. त्यामुळे मोठे आव्हान आमच्यापुढे होते; मात्र ते अकरा तासांच्या प्रयत्नांअंती लीलयापणे पार पडल्याचे मत इंदोरवाला यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. अन्वर, डॉ. सुदर्शन अहिरे, प्रशासनधिकारी युसुफ पंजाब, आदि उपस्थित होते.

Web Title: The brain was in the ear: a successful operation in a woman on the Egyptian woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.