ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली
By प्रसाद गो.जोशी | Updated: January 5, 2024 15:37 IST2024-01-05T15:34:29+5:302024-01-05T15:37:00+5:30
चालकाने उडी मारल्याने तो बचावला.

ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क, वांगणसुळे (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील वांगणसुळे घाटात पिकअपचे ब्रेक फेल झाल्याने हे वाहन १०० फूट खोल दरीमध्ये काेसळले. मात्र चालकाने उडी मारल्याने तो बचावला.
वापी येथून किराणा घेऊन जाणारी पिकअप (क्र्य जी जे २१ वाय ६३४१) ही बाऱ्हे येथे किराणा पोहोचवून परतत असताना वांगणसुळे घाटात सकाळी आठ वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीत कोसळली. यामुळे गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे. ब्रेक फेल होताच चालकाने गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.