दीड लाखाची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 01:50 AM2022-06-04T01:50:52+5:302022-06-04T01:51:21+5:30

माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

Branch engineer caught taking bribe of Rs 1.5 lakh | दीड लाखाची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

दीड लाखाची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद पुन्हा रडारवर : पाणीपुरवठ्याचे ४८ लाखांच्या बिलासाठी मागितले ४ टक्के

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

 

सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम नियमानुसार पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे,(४३, रा. अशोका मार्ग) यांनी ४ टक्के म्हणजेच १ लाख ९० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ही रक्कम ३ टक्के म्हणजे १ लाख ५० हजार ठरली. ही लाचेची रक्कम कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने. अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सापळा पथकातील पोलीस हवालदार सुकदेव मुरकुटे, पोलीस नाईक मनोज पाटील आदींनी गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि.३) सापळा रचून रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांनी शिक्षकांच्या नियमित वेतनाच्या मान्यतेसाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून त्यांना अटक केली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेत लाच स्वीकारल्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून, दोन्ही घटनांमध्ये लाचेची रक्कम ही लाखोंमध्ये असल्याने जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Branch engineer caught taking bribe of Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.