पर्यटनाचे ब्रँडिंग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:35 AM2017-10-07T01:35:28+5:302017-10-07T01:35:37+5:30

जिल्ह्यातील पर्यटन वैशिष्ट्यांचे अधिकाधिक मार्केटिंग आणि ब्रॅँडिंग करणे आवश्यक असून, तिन्ही ऋतुत जिल्ह्यात आढळणारी वैशिष्ट्ये प्रभावीतपणे जगासमोर नेण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

Branding tourism | पर्यटनाचे ब्रँडिंग करा

पर्यटनाचे ब्रँडिंग करा

Next

‘पर्यटन पर्व’ उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना विभागीय आयुक्त महेश झगडे. समवेत जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, नितीन मुंडावरे, सुजित निवसे, जगदीश होळकर, दत्ता भालेराव आदी.

नाशिक : जिल्ह्यातील पर्यटन वैशिष्ट्यांचे अधिकाधिक मार्केटिंग आणि ब्रॅँडिंग करणे आवश्यक असून, तिन्ही ऋतुत जिल्ह्यात आढळणारी वैशिष्ट्ये प्रभावीतपणे जगासमोर नेण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ५ ते २५ आॅक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाºया ‘पर्यटन पर्व’ उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, इतर क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी मर्यादा असताना पर्यटन क्षेत्रातील संधी वाढत आहेत. या क्षेत्रात आपण मागे राहू नये यासाठी आपल्याकडील पर्यटनाचे मार्केटिंग विदेशातील पर्यटन कार्यशाळा आणि चर्चासत्राच्या माध्यमातून करण्यात यावे. तसेच विशिष्ट पर्यटनस्थळांचे नियोजनबद्ध विकासाकडे जिल्हास्तरावर देखील अधिक लक्ष देण्यात यावे. पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात यावी, देशाबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्य्यासाठी विभागातील स्थान वैशिष्ट्यांचा उपयोग करावा. आदिवासी भागातील कलांना जागतिक स्तरावर नेल्यास या भागातील पर्यटन वाढून ग्रामीण जनतेला देखील रोजगार उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी, जिल्ह्यातील वातावरण, मुंबईची समिपता, पारंपरिक कला आणि ऐतिहासिक स्थळांमुळे नाशिकच्या पर्यटन विकासाला चांगली संधी आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन सर्किट निर्माण करणे गरजेचे आहे. सामान्य पर्यटकांनादेखील पर्यटन करणे सुलभ होईल या दृष्टीने विचार करण्यात यावा, असे आवाहन करून जानेवारी-फेबु्रवारी महिन्यात ‘टूर डे सायकलिंग’ उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी पर्यटन पर्वानिमित्त राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली, तर वनसंरक्षक सुजित निवसे यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाकडून दिल्या जात असलेल्या सुविधांची माहिती दिली. यावेळी वाइन समितीचे अध्यक्ष जगदीश होळकर, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title: Branding tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.