हनुमान मंदिरातील पितळी कळस लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:52 AM2019-03-10T00:52:40+5:302019-03-10T00:53:41+5:30
खडकाळी सिग्नल जवळील संकटमोचन हनुमान मंदिरातील पितळी कळस अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : खडकाळी सिग्नल जवळील संकटमोचन हनुमान मंदिरातील पितळी कळस अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी सुभाष भिकाजी नवसे (५२, रा. पंचशिलनगर) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने मंदिरातील ३ हजार रुपये किमतीचा पितळी कळस लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीने मंदिरेही सुरक्षित राहिली नसून चोरट्यांनी पुन्हा मंदिरांमधील कळसांपासून दानपेट्यांपर्यंत आपला मोर्चा वळविल्याने संताप व्यक्त होत आहे. या मंदिराचा कळस पितळी धातूचा पाच थाळ्यांचा होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शहरातील नगरांमध्ये भुरट्या चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.