धाडसी आजीची बिबट्यावर झडप; जबड्यातून वाचविले चिमुकल्या नातीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:05 AM2020-06-11T00:05:30+5:302020-06-11T00:22:23+5:30

अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या पळसे शिवारातील अंकुश कासार यांच्या गट क्रमांक ३१७मधील ऊसशेतीत घडली.

Brave grandmother's leap on leopard; children granddaughter rescued from the leopard | धाडसी आजीची बिबट्यावर झडप; जबड्यातून वाचविले चिमुकल्या नातीला

धाडसी आजीची बिबट्यावर झडप; जबड्यातून वाचविले चिमुकल्या नातीला

Next
ठळक मुद्देदैव बलवत्तर असल्यामुळे दोघीही बालंबाल बचावल्याशेकोटी बांधाजवळ पेटवून ठेवावीअंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे

नाशिक : वेळ रात्री दहा वाजेची...ठिकाण: नाशिक जिल्ह्यातील पळसे गाव... जेवण आटोपून कासार कुटुंबातील आजीबाई आपल्या चार वर्षीय नातीसोबत बाहेर हवेशीर ओट्यावर बसलेल्या....नाती ओट्यावर खेळण्यात दंग असताना अचानकपणे समोरील ऊसशेतीतून बिबट्या चाल करत चिमुकलीवर झडप घेतो अन् तिच्या जोरजाराने रडण्याच्या आवाजाने आजीबाई तत्काळ सावध होत क्षणाचाही विलंब न करता बिबट्या ओट्यावरून खाली जाता नाही तोच त्याच्यावर झडप घेतात अन् त्याला हाताच्या बुक्क्यांनी मारत जबड्यातून आपल्या नातीची सुटका करण्यामध्ये यशस्वी होतात.
अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या पळसे शिवारातील अंकुश कासार यांच्या गट क्रमांक ३१७मधील ऊसशेतीत घडली. आजी व नातीचे दैव बलवत्तर असल्यामुळे दोघीही बिबट या हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. चार वर्षीय समृध्दीच्या डोक्याला काही प्रमाणात जखमा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहे. समृध्दी आता सुखरूप असून डॉक्टरांनी तिला घरीदेखील सोडले असल्याची माहिती वनविभागाने दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील तसेच नाशिक पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे हे आपल्या पथकासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी कासार कुटुंबियांची भेट घेत समृध्दीच्या जखमांची पाहणी क रून पंचनामा केला. तसेच वनरक्षकांच्या टीमने हातात टॉर्च घेत संपुर्ण शेतीचा परिसर पिंजून काढत बिबट्या जवळपास कोठे दडून बसलेला नाही, याची खात्री पटविली. बिबट हल्ला टाळण्यासाठी या भागात जनजागृतीपर ध्वनिफित वाहनाच्या भोंग्याद्वारे वाजवून लोकांना पुन्हा सावध करण्यात आले. तसेच कासार कुटुंबियांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या.

रात्रीच्या वेळी आपल्या घराजवळ जास्त प्रमाणात प्रकाश राहील अशी विद्युत व्यवस्था करावी. शेकोटी बांधाजवळ पेटवून ठेवावी आणि अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे. ऊसशेतीचे बांध व घराचा ओटा यामध्ये अंतर असले पाहिजे. तसेच चेनलिंक फेन्सिंगचे कुंपण तरी बांधावर किमान घराच्या समोर तर के लेले असावे. एकलहरे, पळसे, हिंगणवेढे या गोदावरी, दारणा नदीच्या खोऱ्यात ऊसशेती भरपूर प्रमाणात केली जाते. यामुळे या भागात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढताना दिसत असल्याचे भदाणे यांनी सांगितले. सामनगाव बीटमधील सुमारे २० ते २५ गावांमध्ये बिबट संचार असून या सर्वच गावांमध्ये वनविभागाकडून पिंजरे तैनात करण्यात आले आहेत; मात्र शेतकऱ्यांनी व शेतीवर राहणाºया शेतमजूरांनी आपली व कुटुंबियांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Web Title: Brave grandmother's leap on leopard; children granddaughter rescued from the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.