वणीत दीड लाखाची धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:15 IST2020-07-26T21:40:59+5:302020-07-27T00:15:48+5:30
वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे.

वणीत दीड लाखाची धाडसी चोरी
वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे.
बसस्थानका लगत ग्राम पालीकेच्या व्यापारी संकुलात जितेंद्र देवराज दुसाने यांचे महालक्ष्मी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. रस्त्यालगत असलेल्या या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर जाऊन छताचा पत्रा उचकवून दोन संशयितांनी इलेक्ट्रीक उपकरणांसह दीड लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुसाने नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास गेले. त्यावेळी अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली. शनिवारी रात्री १२ वाजून ५८ मिनिटांनी प्रवेश केला व २ वाजून १८ मिनिटांनी तेथून पळ काढला. चेहऱ्याला मास्क, गॉगल व पांढºया रंगाचा रेनकोट असा त्यांचा पेहराव होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये आली आहे.