सातपूरच्या कंपनीत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:12 AM2021-06-26T04:12:05+5:302021-06-26T04:12:05+5:30

सातपूर : औद्योगिक वसाहतीतील उज्ज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी ...

Brave theft in Satpur company | सातपूरच्या कंपनीत धाडसी चोरी

सातपूरच्या कंपनीत धाडसी चोरी

googlenewsNext

सातपूर : औद्योगिक वसाहतीतील उज्ज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना समोर आली आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी कंपनीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून डिव्हिआर व हार्डडिस्क सोबत घेऊन जात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे कंपनी परिसरात २४ तास सुरक्षारक्षक नेमलेला असताना ही धाडसी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीत उज्ज्वल भारत नावाचा कारखाना आहे. या कारखान्यांतर्गत एमडी ट्रेडर्सचे काम चालते. प्लास्टिक प्रिंटिंगसह पोल्ट्री व्यवसायाला लागणारे खाद्य (ट्रेडिंग) आणि ब्रॉइलर कल्ल बर्डस या कंपनीमार्फत पुरविली जाते. कंपनीचे संचालक दीपक आव्हाड नेहमीप्रमाणे कंपनीचे कामकाज आटोपून गुरुवारी (दि. २४) रात्री आठ वाजता घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी कंपनीत गेले असता ऑफिसमधील लॉकर व त्यातील पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. यावेळी कंपनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे उलट्या दिशेने फिरविलेले, तर काही कॅमेऱ्यांचे कनेक्शन तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. विशेष म्हणजे ऑफिसमध्ये दोन लॅपटॉप असताना त्यांना हात न लावता, तसेच कुठल्या प्रकारची तोडफोड न करता ही चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे यांच्यासह फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, कंपनीच्या मागील बाजूतील खिडकीतून तिजोरी फेकून चोरट्यांनी पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कंपनीचे संचालक दीपक आव्हाड यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

===Photopath===

250621\25nsk_12_25062021_13.jpg

===Caption===

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत झालेल्या चोरीची चौकशी करताना पोलीस 

Web Title: Brave theft in Satpur company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.