कळवणला संचारबंदीचे उल्लंघन; १९ दुकानांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:16+5:302021-05-07T04:15:16+5:30

शहरातील मेनरोड, शिवाजीनगर, गणेशनगर परिसरातील दुकानांवर मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई करीत सदर दुकाने ...

Breach of curfew reported; Action taken against 19 shops | कळवणला संचारबंदीचे उल्लंघन; १९ दुकानांवर धडक कारवाई

कळवणला संचारबंदीचे उल्लंघन; १९ दुकानांवर धडक कारवाई

Next

शहरातील मेनरोड, शिवाजीनगर, गणेशनगर परिसरातील दुकानांवर मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई करीत सदर दुकाने दि. १५ मेपर्यंत सील केली.

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कळवण शहरातील इतर दुकाने सुरू असल्याची तक्रार होती. तहसीलदार कापसे यांनादेखील काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी नगर पंचायत प्रशासनास सूचना केल्यानंतर नगर पंचायतच्या भरारी पथकाने शहरात फेरफटका मारला असता त्यांना १९ दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने सदर धडक कारवाई केली.

नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी दीपक बंगाळ, पाणीपुरवठा अधिकारी उमेश राठोड, संजय आहेर, अमोल आहेर, नकुल सूर्यवंशी, धनराज परदेशी, संजय आहेर, बापू जाधव, दत्ता जाधव, स्वप्नील पगार, बापू निकम, विनोद निकम यांचे पथक कळवण शहरात तैनात करण्यात आले असून या पथकाने ही कारवाई केली.

इन्फाे...

खोडसाळ मेसेजमुळे कारवाई

कळवण शहरातील दुकानदारांना कुणी तरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने एका व्हाॅट्सॲप ग्रुपवर मेसेज पाठवून त्यात सर्व दुकाने ९ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहतील, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे दुकाने सुरू झाली आणि पथकाकडून कारवाईस पात्र ठरले. नगर पंचायतच्या एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर याबाबत मेसेज पाठवल्यामुळे खोडसाळपणा झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा कोणी केला याचा उलगडा झाला नाही. मात्र १९ दुकानदार या खोडसाळपणाला बळी पडले.

फोटो - ०६ कळवण १

कळवण शहरातील दुकान सील करताना नगर पंचायत कर्मचारी.

===Photopath===

060521\06nsk_13_06052021_13.jpg

===Caption===

कळवण शहरातील दुकान सील करतांना नगरपंचायत कर्मचारी.

Web Title: Breach of curfew reported; Action taken against 19 shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.