जगतापनगरला रस्त्यावर भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:25 AM2019-05-20T00:25:42+5:302019-05-20T00:26:05+5:30
सिडको येथील पाटीलनगर भागात गेल्या आठवड्यातच रस्त्याला मोठे भगदाड पडले होते, यापाठोपाठ रविवारी (दि.१९) पुन्हा याच परिसरातील जगतापनगर भागात रस्त्याला मोठे भगदाड पडले, यात एक महिला जखमी झाल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिडको : येथील पाटीलनगर भागात गेल्या आठवड्यातच रस्त्याला मोठे भगदाड पडले होते, यापाठोपाठ रविवारी (दि.१९) पुन्हा याच परिसरातील जगतापनगर भागात रस्त्याला मोठे भगदाड पडले, यात एक महिला जखमी झाल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिडकोतील पाटीलनगर भागात काही दिवसांपूर्वीच मुख्य रस्त्याला मोठे भगदाड पडले होते याबाबत प्रभागाचे नगरसेवक श्याम कुमार साबळे यांनी महापालिकेला कळल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी येथील खड्डा वरवर बुजवला यापाठोपाठ रविवारी पुन्हा याच भागातील जगतापनगर येथील मुख्य रस्त्यावर रस्त्याला मोठा खड्डा पडला असून, या खड्ड्यात एक महिला म्हणून जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी मनपा मनपा कळवल्यानंतर त्यांच्याकडून तत्काळ रस्त्याची डागडुजी दुरु स्ती काम करण्यात आले सिडको भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट केली जात असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.
दुरुस्तीची मागणी
रविवारी सुटीच्या दिवशी जगतापनगर भागातील मुख्य रस्त्याला पडलेल्या खड्ड्यात एक महिला पाय अडकून जखमी झाल्याचा प्रकार घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही, परंतु मनपाने याबाबत दखल घेऊन रस्त्याची कामे करताना चांगल्या प्रकारे करावी, अशी मागणी केली जात आहे.