कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:15 AM2019-08-19T02:15:08+5:302019-08-19T02:15:28+5:30

लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पानेवाडी स्थानकात थांबविण्यात आली. दुसरे इंजिन जोडून ही गाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली असली तरी प्रवाशांना मात्र तासभर रखडावे लागले.

A breakdown in Kamayani's engine | कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड

कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड

Next

मनमाड : लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पानेवाडी स्थानकात थांबविण्यात आली. दुसरे इंजिन जोडून ही गाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली असली तरी प्रवाशांना मात्र तासभर रखडावे लागले.
रविवारी सायंकाळी कामायनी एक्स्प्रेस भुसावळकडे जात असताना पानेवाडी स्थानकाजवळ गाडी आल्यावर इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे चालकाने गाडी थांबविली. रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत तत्काळ दुसरे इंजिन बोलविण्यात आले. आलेले इंजिन गाडीला जोडले गेले. यानंतर गाडी भुसावळकडे रवाना झाली. यामुळे सुमारे तासभर प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागली. या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Web Title: A breakdown in Kamayani's engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.