गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षाची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:59 PM2020-07-01T18:59:47+5:302020-07-01T19:00:32+5:30
संगमेश्वर : दरवर्षी आषाढी एकादशीला संगमेश्वर भागातून निघणारी गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षापासूनची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे.
संगमेश्वर : दरवर्षी आषाढी एकादशीला संगमेश्वर भागातून निघणारी गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षापासूनची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे.
संगमेश्वरातील महादेव मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी गाव प्रदक्षिणा फेरी काढण्यात येते. त्या भाविकांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाता आले नाही ते या फेरीत सहभागी होतात. ही फेरी संगमेश्वरातील सावता महाराज मंदिर व इतर मंदिराजवळून वाटचाल करीत गिरणा पुलाजवळ गावाच्या वेशीवर विठुमाऊलीच्या चरणी लीन होत. टाळ मृदुंगाच्या आवाज वारकऱ्यांची ही गाव फेरीचा आनंद यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना घेता आला नाही. गेल्या शंभर वर्षापासूनची ही परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली, असे महादेव मंदिराचे विश्वस्त पंढरीनाथ अस्मर व सावता महाराज मंदिराचे विश्वस्त ह. भ. प. पंढरीनाथ महाजन यांनी सांगितले.
गाव प्रदक्षिणा फेरी रद्द झाल्याने वारकऱ्यांची सेवा यंदा करता आली नसल्याचे राजेंद्र चौधरी व ह. भ. प. कैलास महाराज यांनी सांगितले. दरम्यान, आज भाविकांनी घरी राहूनच विठ्ठल माऊलीच्या प्रतिमेची पुजा करुन आषाढी एकादशी साजरी केली. यानिमित्ताने होणारे कीर्तन, प्रवचन व दर्शनाचे कार्यक्रम होवू शकले नाही.