दारू बाटल्यांची तोडफोड

By admin | Published: July 11, 2017 12:16 AM2017-07-11T00:16:53+5:302017-07-11T00:18:09+5:30

तिडके कॉलनी : महिलांचे दहा तास आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांशी हुज्जत

Breaking of liquor bottles | दारू बाटल्यांची तोडफोड

दारू बाटल्यांची तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सुरू होऊ पाहणाऱ्या मद्यविक्रीच्या दुकानाला गेल्या महिनाभरापासून विरोध करणाऱ्या व त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांच्या दारी खेट्या घालूनही न्याय न मिळालेल्या तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हेन्यूमधील संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून तब्बल दहा तास आंदोलन केले. दुकानदार दुकान सुरू करण्यास अडून बसला, तर रहिवाश्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे तिडके कॉलनीत काहीकाळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
लंबोदर अव्हेन्यू या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात तरूण सुखवानी यांनी मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न चालू केल्याची माहिती इमारतीतील सभासदांना मिळाल्यावर त्यांनी त्यास हरकत घेतली व त्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची पंधरा दिवसांपूर्वी भेट घेऊन कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान सुरू होणार नाही, असे तोंडी आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला भुललेले इमारतीतील रहिवासी निर्धास्त असताना सोमवारी सकाळी १० वाजता मद्यविक्री दुकानदाराने टेम्पोतून थेट मद्याच्या बाटल्या आणून त्या गाळ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही बाब इमारतीतील रहिवाश्यांच्या लक्षात येताच त्यांनी सामूहिकपणे त्यास विरोध दर्शविला. यावेळी दुकानदार व रहिवाश्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
दुकानदाराच्या म्हणण्यानुसार त्याने सर्व कायदेशीर पूर्तता करूनच दुकान सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले, तर रहिवाशांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डरशी केलेल्या करारात इमारतीत कोणतेही मद्याचे दुकान सुरू करता येणार नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून ताठर भूमिका घेण्यात आल्यामुळे अखेर इमारतीतील महिलांनी दाद मागण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांनी तक्रार करूनही काहीच कार्यवाही का झाली नाही, अशी विचारणा महिलांनी करून धारेवर धरल्यामुळे या ठिकाणी बाचाबाचीही झाली, तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘गेट आउट’ म्हणूनही पिटाळून लावल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. रात्री ८ वाजेपर्यंत
ठिय्या आंदोलनइमारतीच्या खालीच दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्या बाटल्या रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे मिलिंदनगर ते गोविंदनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूकही खंडित झाली. या घटनेचे वृत्त कळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम होते. रात्री ८ वाजेपर्यंत इमारतीतील रहिवाशांनी दुकानासमोरच ठिय्या मांडला.लोकप्रतिनिधींची भेटसकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल घेत आमदार निर्मला गावित, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनीही लंबोदर अव्हेन्यू इमारतीला भेट देऊन रहिवाशांशी संवाद साधला तसेच मद्यविक्री दुकानाला विरोधही दर्शविला. यावेळी बी. आर. पाटील, वीणा चव्हाण, मनीषा धांडे, डॉ. उल्का पिंचा, कल्पना पाटील, डॉ. हेमांगी चौधरी आदी रहिवाशांनी त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार केली. रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टातून स्टे आणा, असा सल्ला दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तिडके कॉलनीतील रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बंदोबस्त तैनात केला.

Web Title: Breaking of liquor bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.