Breaking : नाशिककरांसाठी पुन्हा एकदा मालेगावमधून धक्का, 5 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:04 AM2020-04-12T02:04:00+5:302020-04-12T02:04:50+5:30
मालेगाव मधून सातत्याने कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून पंधरा रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे.
नाशिक : नाशिककरांसाठी शनिवार जणू दिलासा देणारा ठरला होता मात्र मध्यरात्री बारा वाजता प्राप्त झालेल्या प्रलंबित अहवाल आणि पैकी पाच अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले हेच सगळे रुग्ण मालेगाव मधील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे मालेगाव मधून एकूण 22 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 17 नमुने निगेटिव आले तर पाच नमुने हे पॉझिटिव आले आहेत यामध्ये तीन महिला आणि आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
मालेगाव मधून सातत्याने कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून पंधरा रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. एकूणच प्रशासनाला मालेगाव मध्ये करून नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याचे यावरून दिसत आहे नाशिक जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता बीच झालेला आहे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून पुणे येथे पाठविण्यात येणाऱ्या करुणा संशयित रुग्णांचे घशाच्या सराव चे नमुने हे मोठ्या संख्येने प्रलंबित राहत आहे पुणे येथील प्रयोगशाळेत शाळेवर वाढता तान यावरून दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागले आहे मध्यरात्री उशिरापर्यंत नमुन्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असल्याने प्रशासनाच्या आता झोप झालेली आहे प्रलंबित असलेल्या तब्बल एकशे 118 पैकी एकूण 53 अहवाल शनिवारी मध्यरात्रीही प्रशासनाला प्राप्त झाले त्यापैकी 48 नमुने हे निगेटिव आले तर मालेगाव मधील पाच नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे