कडाक्याच्या थंडीत आदिवासी गरिबांना ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:17 PM2018-12-09T17:17:10+5:302018-12-09T17:18:54+5:30
वेळुंजे (त्र्यंबक) : दातृत्वाच्या भावनेतून तालुक्यातील आश्रम शाळा पिप्री (त्र्यंबक) येथील असंख्य गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना थंडीच्या कडाक्यात तुळजा भवानी ट्रस्ट नाशिकरोड या संस्थेच्या वतीने नव्या ऊबदार स्वेटर व कुंदेवाडी येथे महिलांना व जेष्ठांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

ऐन थंडीच्या कडाक्यातच आदिवासी गोरगरिबांना ऊब मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी संस्थेचे सचिव सुभाष पाटोळे, राजेंद्र गायकवाड, किशोर जाचक, बहिरू मुळाणे आदी उपस्थित होते.
तुळजा भवानी ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावण्याचे काम चालू असतांना वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे गोरगरीब यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दुष्टीने हिवाळ्यात आवश्यक असलेले आवश्यक ऊबदार स्वेटर व ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.
पिंप्री येथील आश्रम शाळेतील मुलांना स्वेटर व कुंदेवाडी येथील जेष्ठ नागरिक यांना ऊबदार ब्लकेट उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेच्या या समाजसेवी कार्याचे परिसरातून विद्यार्थी- पालक- शिक्षक यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. यावेळी बहिरू मुळाणे, हरिभाऊ बोडके, आत्माराम महाले, सुभाष पाटोळे, राजेंद्र गायकवाड, रवींद्र गायकवाड, किशोर जाचक, रूंजा पाटोळे, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी लवटे, पोपट पाटोळे, जाधव, अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांसह विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
(दोन फोटो ०९ पिंप्री,०९ पिंप्री १)