कळवणच्या मेनरोडने घेतला मोकळा श्वास

By admin | Published: January 2, 2016 11:19 PM2016-01-02T23:19:31+5:302016-01-02T23:26:39+5:30

कळवणच्या मेनरोडने घेतला मोकळा श्वास

Breathing with the keynote manorod | कळवणच्या मेनरोडने घेतला मोकळा श्वास

कळवणच्या मेनरोडने घेतला मोकळा श्वास

Next

कळवण : शहरातील मेनरोडसह ठिकठिकाणी असलेले फलक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने हटविल्याने मेनरोडसह
गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला.
कळवण-नाशिक आणि कळवण-देवळा या मेनरोडवर तसेच महाराजा चौक, कळवण बसस्थानक परिसर, बसस्थानकाजवळील पूल, फाशी चौक, मराठी मुलांची शाळा, फुलाबाई चौक, गणेशनगर आदिंसह सार्वजनिक व शासकीय जागांवर अभिनंदन, शुभेच्छांसह विविध कार्यक्रम, उपक्रमांचे फलक कळवणकर जनतेचे लक्ष वेधून घेत असल्याने या जागांना महत्त्व आले होते.
सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने या जागांनी काही दिवसांपासून मोकळा श्वास घेतला
आहे.
कळवणकर जनतेने या निर्णयाचे स्वागत केले असून, कळवण शहरातील रस्ते आणि वाहतुकीच्या प्रश्नावरही गंगाथरण यांनी लक्ष घालावे, अशी माफक अपेक्षा कळवणकर जनतेची आहे.
सार्वजनिक व शासकीय जागांवर बॅनर्स व फलक लावण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण नगरपंचायत यांची परवानगी असणे आवश्यक असून, परवानगी देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करीत नकारघंटा देत असल्याने सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्था, संघटन आता हतबल झाले
आहेत.
परवानगी घेऊन काही मर्यादित कालावधीकरिता फलक लावता येणार असल्याचे संकेत सूत्रांनी
दिले .
शिवाय शासकीय जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनापरवानगीने लावण्यात
आलेले बॅनर्स व फलक तत्काळ काढून घेण्याच्या सूचनादेखील केल्या गेल्या असून, सूचनांचे पालन न केल्यास सार्वजनिक व शासकीय जागा विद्रूप केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे संकेत शासकीय यंत्रणेने दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Breathing with the keynote manorod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.