लाचखोर अभियंत्यांकडे ३५ तोळे सोन्यासह पाच लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:15 AM2017-10-16T00:15:26+5:302017-10-16T00:15:30+5:30
लाचलुचपत विभाग : स्थावर मालमत्तेचा शोध; तीन पथकांकडून चौकशी नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदारास कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ १२) रंगेहाथ पकडले़ या तिघांच्या घरझडतीत लाचलुचपत विभागाच्या हाती सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाख रुपयांची रोकड लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, तपासी अधिकाºयांची तपासाची गती पाहता त्यांच्यावर राजकीय दबाब असल्याची चर्चा आहे़
लाचलुचपत विभाग : स्थावर मालमत्तेचा शोध; तीन पथकांकडून चौकशी
नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदारास कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ १२) रंगेहाथ पकडले़ या तिघांच्या घरझडतीत लाचलुचपत विभागाच्या हाती सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाख रुपयांची रोकड लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, तपासी अधिकाºयांची तपासाची गती पाहता त्यांच्यावर राजकीय दबाब असल्याची चर्चा आहे़
शासकीय ठेकेदार मोहिते यांनी रस्ता दुरुस्तीसाठी निविदा भरलेली होती़ त्यानुसार रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहिते यांना पैसे अदा करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती़ याबाबत मोहिते यांनीनाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मोहिते यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून शुक्रवारी (दि़१३) सापळा रचला़ त्यानुसार कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांनी मोहिते यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांचे मूळ चलन व १ लाख रुपयांचे नकली चलन) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण उपविभाग) कार्यालयात स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर ही रक्कम कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार व सहायक अभियंता सचिन पाटील यांच्या निर्देशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली़ या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती़ तसेच शनिवारी न्यायालयात हजर केले असता मंगळवार (दि़१७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस कोठडीतील कालावधीत तिघाही अधिकाºयांच्या अपसंपदेच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत़ या पथकांनी आतापर्यंत सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाखांची रोकड शोधून काढली आहे़ तर स्थावर मालमत्तेचा शोध सुरू आहे़
तपासाच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांना २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती़ त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधीक्षक डॉ़ शशिकांत महावरकर व त्यांच्या टीमने मोठे घबाड शोधून काढले होते़ मात्र, सद्यस्थितीत तीन अभियंते गळाला लागूनही तपासातील प्रगतीबाबत माध्यमांना माहिती दिली जात नसल्याने कारवाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे़ तसेच या प्रकरणात पकडलेले कार्यकारी अभियंत्यांचे स्टाँग राजकीय वजन पाहता मंत्रालयातून दबाव येत असल्याची चर्चा आहे़
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा अभियंत्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या आरोपींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या तीन पथकांनी आतापर्यंत या तिघांकडे सुमारे ३५ तोळे सोने व पाच लाख रुपयांची रोकड शोधून काढली आहे़ तसेच स्थावर मालमत्तेचा शोध सुरू असून तपासाबाबत कोणताही राजकीय दबाव नाही़
- प्रभाकर घाटगे, तपासी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक