लाचखोर वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:30 AM2018-11-28T00:30:37+5:302018-11-28T00:31:18+5:30
विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून टाकणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. २, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी) यास मंगळवारी (दि़२७) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून टाकणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. २, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी) यास मंगळवारी (दि़२७) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरू आहे़ या चौकशीच्या कामात मदत तसेच खात्यातून काढून टाकणार नाही असा आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात माळी याने सोमवारी (दि़२६) लाचेच्या स्वरूपात १५ हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सापळा लावला होता़ पोलीस आयुक्तालयातील पहिल्या मजल्यावरील पुरुष प्रसाधनगृहात तक्रारदाराकडून लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम घेताच वरिष्ठ लिपिक अनिल माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़ लिपिक माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस आयुक्तालयात शांतता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस आयुक्तालयात सापळा लावून कारवाई केली़ या कारवाईनंतर पूर्ण पोलीस आयुक्तालयात शांतता पसरली होती़ तसेच बहुतांशी अधिकारी व कर्मचारीही फोन उचलत नसल्याचे चित्र होते़