लाचखोर मंडल अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

By admin | Published: June 19, 2015 11:24 PM2015-06-19T23:24:06+5:302015-06-19T23:24:30+5:30

लाचखोर मंडल अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

The bribe was caught by the Board officials | लाचखोर मंडल अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

लाचखोर मंडल अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

Next

सिन्नर : शेतजमिनीच्या खरेदीविरुद्ध तहसीलदारांकडे केलेल्या अर्जाच्या चौकशीचा अहवाल लाभात करून देणे व खरेदीची नोंद मंजूर न करणे यासाठी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारे पांढुर्लीचे मंडळ अधिकारी (सर्कल) योगेश दत्तात्रय कुलकर्णी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़
याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव रामभाऊ पवार (५५) यांच्या वडिलांची सोनांबे शिवारात एक हेक्टर ७१ आर (गट नंबर ५८,४२४,६९२) शेती आहे़ त्यांच्या वडिलांनी पवार व त्यांच्या तीन नंबर भावास न विचारता दोन नंबरच्या भावास जमिनीची खरेदी दिली़ त्याविरुद्ध पवार यांनी सिन्नर तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दिला होता़ त्यानुसार तहसीलदारांनी मंडळ अधिकारी (पांढुर्ली) योगेश दत्तात्रय कुलकर्णी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़
पांढुर्लीचे मंडळ अधिकारी कुलकर्णी यांनी या अर्जाची चौकशी करून दोन नंबरच्या मुलाच्या नावे खरेदी दिलेल्या शेतजमिनीची नोंद मंजूर न करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी सदाशिव पवार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानुसार नाशिक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील गांगुर्डे, हवालदार महेश नांदुर्डीकर, हवालदार डोंगरे, रेवगडे, जाधव यांनी शुक्रवारी सापळा लावला़
सिन्नर तहसीलदार कार्यालयासमोरील एका खासगी हॉटेलमध्ये पवार यांच्याकडून दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़(वार्ताहर)

—इन्फो—
३० जूनला सेवानिवृत्ती
मंडल अधिकारी योगेश दत्तात्रय कुलकर्णी हे येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होणार होते़ मात्र, तत्पूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना दहा हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडल्याने विविध प्रकारची चर्चा सुरू होती़

फोटो : आर / फोटो / १९ वायडीकुलकर्णी या नावाने सेव्ह केला आहे़

Web Title: The bribe was caught by the Board officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.