तलासरी तपासणी नाक्यावरील लाचखोर आरटीओ इन्स्पेक्टर जाळ्यात
By अझहर शेख | Published: September 4, 2023 10:50 PM2023-09-04T22:50:22+5:302023-09-04T22:50:47+5:30
दोघांविरुद्ध तलासरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : वसई परिवहन विभागाच्या अखत्यारित असलेल्या पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी (दापचेरी) आरटीओ तपासणी नाक्यावर नाशिक लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी(दि.4) सापळा रचला. त्याठिकाणी मोटार वाहन निरिक्षक संशयित निलोबा ज्योतिबा तांदळे (५४,रा.खारघर) यांच्या निर्देशाने खासगी इसम सुनील सदाशिव भोईर (६२) याने तीनशे रूपयांची लाच तक्रारदराकडून घेतली असता पथकाने रंगेहाथ पकडले.
नाशिक लाचलुचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्य वाहनाची कागदपत्रांची तपासणी करून विनाकरण दंड न करण्याच्या मोबदल्यात तीनशे रूपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनाला तपासणी नाका ओलांडण्यासाठी मदत करावी, याकरिता तांदळे यांच्या निर्देशाने भोईर याने तीनेश रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. यावेळी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयितास ताब्यात घेतले.
दोघांविरुद्ध तलासरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.