सिन्नर येथे सुतार, लोहार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:44 PM2018-11-30T17:44:44+5:302018-11-30T17:45:03+5:30
पाथरे : सुतार, लोहार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा विश्वकर्मा समाज मंच यांच्यातर्फे सिन्नर येथे उत्साहात पार पडला.
पाथरे : सुतार, लोहार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा विश्वकर्मा समाज मंच यांच्यातर्फे सिन्नर येथे उत्साहात पार पडला.
रवींद्र सातपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर उद्योजक नारायण क्षीरसागर, भारत जाधव, राजेंद्र राजगुरू, विष्णू गवळी, अरुण गाडेकर, किशोर पगारे, बाळासाहेब दिघे, निवृत्ती बोºहाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वधू-वर मेळाव्यात हुंडाबंदी, जास्त अपेक्षा न करता, आर्थिक खर्च न करता, कर्जबाजारी न होता साध्या पद्धतीने विवाह करण्यात यावे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. धावपळीच्या जीवनात मनुष्याचे पूर्वीप्रमाणे नातेवाईक, समाजात फिरणे व गाठी भेटी घेणे या गोष्टी काळानुसार बदलत आहे. त्यामुळे लग्न जमणे, नाते संबंध माहीत होणे आदी कारणांमुळे समाजातील तरुण वर-वधू यांची माहिती मिळणे कठीण होत चालले आहे. समाजाला व्यासपीठ मिळावे, नातेसंबंध प्रस्तावित व्हावे या हेतूने सिन्नर येथे राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील सुमारे ४२५ वधू-वर उपस्थित होते.