कुमावत समाजाचा वधू-वर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:00 AM2018-05-09T00:00:41+5:302018-05-09T00:00:41+5:30
पाथरे : कुमावत उन्नती समाज मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेला राज्यस्तरीय वधू- वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
पाथरे : कुमावत उन्नती समाज मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेला राज्यस्तरीय वधू- वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. संगणकीय युगात एकममेकांच्या भेटी होणे कमी होत आहेत. त्यातच मुले-मुली उच्चशिक्षित होऊ लागल्याने विवाहास उशीर होतो. याचा विचार करता नात्यांची गुंफण जुळवी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक येथील आठवण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, कुमावत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कारवाळ, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, मोहन शेलार, अशोक भवरे, प्रफुल्लचंद्र कुमावत, पंडितराव कुमावत, देवीदास परदेशी, बाजीराव परदेशी, दीपक मुंडावरे, भगवान अनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्र मास सुरु वात झाली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी मंडळाच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आणि मंडळास २५ लाखांचे सभागृह बांधून देऊ, असे आश्वासन दिले. त्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्या, असेही ते म्हणाले. मेळाव्यात ५०० वधू-वरांनी नाव नोंदणी केली. तर ३२५ मुला-मुलींनी स्वत:चा परिचय करून दिला. काही दिवसांपूर्वी समाजाचा तरुण मयत झाला, त्याच्या मुला-मुलीला मंडळाने दत्तक घेऊन पुढील सर्व शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली. यापुढे समाजातील विधवा महिलांना शिलई मशीन देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. समाजातील गरीब मुलांना शिक्षणासाठी हातभार लावला जाईल, असे यावेळी ठरले. या कार्यक्रमास जळगाव, धुळे, शहादा, औरंगाबाद, अहमदनगर, चाळीसगाव, पुणे, सातारा आदींसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वधू-वर, पालक उपस्थित होते. यावेळी अर्जुन अनावडे, कैलास सार्डीवाळ, कैलास परदेशी, बापूसाहेब कारवाळ, भाऊसाहेब परदेशी, भाऊसाहेब माचीवाळ, हिरामण परदेशी, बापूसाहेब कुमावत उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पंडितराव कुमावत व बापूसाहेब कारवाळ यांनी केले. प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी नागेश व अश्विनी आणि योगेश व मेघा यांचा शुभविवाह मंडळाच्या खर्चाने लावण्यात आला.