लेवा समाजाचा वधू-वर मेळावा

By admin | Published: November 17, 2016 10:21 PM2016-11-17T22:21:46+5:302016-11-17T22:22:32+5:30

लेवा समाजाचा वधू-वर मेळावा

Bride-rallies of Leva community | लेवा समाजाचा वधू-वर मेळावा

लेवा समाजाचा वधू-वर मेळावा

Next

नाशिक : येथील लेवा समाज कल्याण मंडळाच्या वतीने प. सा. नाट्यगृहात वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रोहिणी खेवलकर-खडसे, कुंदन ढाके, डॉ. काशीनाथ खडसे, किशोर चौधरी, सुधाकर चौधरी आदि उपस्थित होते.
यावेळी खेवलकर म्हणाल्या की, लेवा समाजाने विवाह जुळविताना काळाची पावले ओळखून नातेसंबंध जोडले पाहिजेत. कारण विवाहसंस्था म्हणजे आपल्या कुटुंब संस्थेचा पाया असून, त्यावरच निकोप समानाची जडणघडण अवलंबून असते.
यावेळी लेवा समाजकल्याण मंडळाचे अध्यक्ष संजय वायकोळे यांनी सांगितले की, गेल्या २0 वर्षापासून मेळावा आयोजित करण्यात येत असून, यंदा सुमारे २00 वधू-वरांची नावनोंदणी करण्यात आली आहे. प्रास्ताविक अरविंद अतरदे यांनी केले. व्यासपीठावर सुनील पाटील, सुरेश जावळे, नामदेव पाटील, दिगंबर धांडे, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. जयंत ढाके, अनिल महाजन आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन लीना पाटील यांनी केले. आभार स्वाती पाचपांडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रकाश बेंडाळे, मीना बेंडाळे, लीलाधर लोखंडे, अशोक भिरूड, वासुदेव पाटील, सुधीर बढे, राजेंद्र नेहेते, तुकाराम पाटील, नितीन पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bride-rallies of Leva community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.