येवल्यात वधु-वर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:43 AM2018-06-01T00:43:20+5:302018-06-01T00:43:20+5:30
येवला : शहरातील विवाह संस्थेच्या वतीने रविवार, दि. 3 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 यावेळेत शहरातील विचूंर रोड वरील राधाकृष्ण लॉन्स येथे सर्वजातीय राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वजातीय नोकरदार, व्यवसायीक, विधवा, विधूर, घटस्फोटीत, अपंग आदी विवाह इच्छुक वधु-वर वा त्यांच्या पालकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. प्रवेश विनामूल्य असलेल्या या वधु-वर परिचय मेळाव्यास येतांना प्रत्येक उपवर मुला-मुलींनी स्वत:चा रंगीत पोष्टकार्ड साईज फोटो व आपला बायोडाटा बरोबर आणावा. सर्व जातीय उपवर मुला- मुलींनी व त्यांच्या पालकांनी या वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात सहभागी नोंदवावा असे आवाहन आयोजक विजय ठाकरे, सौ. प्रमिला ठाकरे, बिपीन लासुरे, बापू पाबळे, प्रकाश पाबळे यांनी केले आहे.