पोलिसांच्या एण्ट्रीने वऱ्हाडींची पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:39+5:302021-02-27T04:17:39+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केलेली आहे. लग्नसोहळ्यांना होणारी वाढती गर्दी चिंतेचा विषय बनल्याने सोहळ्यावर ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केलेली आहे. लग्नसोहळ्यांना होणारी वाढती गर्दी चिंतेचा विषय बनल्याने सोहळ्यावर निर्बंध आणले आहेत. तरीही लोक लग्नसोहळ्यांना गर्दी करत बिनधास्तपणे वावरताना दिसून येत आहेत. हॉटेल रेन फॉरेस्ट येथेही हेच दृश्य पोलिसांना छाप्यावेळी दिसून आले. या सोहळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला होता. एकमेकास अलिंगन देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जात होते. या सोहळ्यात नियमांचे उल्लंघन होत असल्याची खबर पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने हॉटेलवर छापा टाकला. विवाहस्थळी विनामास्क ३० लोक आढळून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हॉटेल व्यवस्थापक व मालक यांच्याकडून दंडात्मक कारवाई स्वरूपात ३०,०००/- रुपये वसूल करण्यात आले. या संयुक्त कारवाईत इगतपुरी पोलीस ठाणे व घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
इन्फो
हॉटेलवर यापूर्वीही कारवाई
या पूर्वीही २६ जून २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व हॉटेल बंद असताना रेन फॉरेस्ट हॉटेल सर्रास चालू होते. तेव्हाही इगतपुरी पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई केली होती.
त्याआधी रात्री मोठमोठ्या पार्ट्या प्रसंगी विविध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तरीही हॉटेल व्यवस्थापन सतत नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
फोटो- २६ रेन फॉरेस्ट
===Photopath===
260221\26nsk_24_26022021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ रेन फॉरेस्ट