देशमाने परिसरातील पुलांचे कथडे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:09 PM2020-07-24T22:09:16+5:302020-07-25T01:11:38+5:30
देशमाने शिवारातील नाशिक -औरंगाबाद मार्गावरील गोई नदी, खडकी नाला व २८ क्र . वितरिका वरील पुलावरील लोखंडी कथडे वाहनांच्या धडकेने कमकुवत झाले आहे. तर वितरीका क्र .२५ वरील कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर असते.
देशमाने : शिवारातील नाशिक -औरंगाबाद मार्गावरील गोई नदी, खडकी नाला व २८ क्र . वितरिका वरील पुलावरील लोखंडी कथडे वाहनांच्या धडकेने कमकुवत झाले आहे. तर वितरीका क्र .२५ वरील कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर असते. महामार्ग चौपदरीकरणात सर्व पुलांची उंची वाढवत त्यावर लोखंडी कथडे बसवण्यात आले आहे. मात्र वेळोवेळी झालेल्या वाहन अपघातात या कथड्याची दुरु स्तीच करण्यात न आल्याने भविष्यात ही पुलें वाहतुकीस धोकादायक ठरू शकतात. अवजड वाहणा बरोबरच प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातात प्रवाशांच्या जीवाला धोका वाढू शकतो. दरम्यान, या मार्गावरील नाशिकहून येवल्याकडे जाताना वितरीका क्र . २५ वरील पुलाचे कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नाहिशे झाले आहे. सुमारे तीन वर्षाहून अधिक काळ उलटूनही या कथड्याची दुरु स्ती न केल्याने या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते. सभोवताल वाढलेली झाडे, झुडपे यामुळे तर याठिकाणी तर पुलाचे अस्तित्व देखील कळत नाही.
विशेष बाब म्हणजे याच मार्गावरून बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्?यांचा कायम राबता आहे. सदर बाब लक्षात येऊन देखील त्यांचा या समस्ये कडे कानाडोळा करत आहे.
-----------------
मन्याड नदीवरील पुलाला लागेना मूहूर्त
नांदगाव तालुक्यातील मन्याड नदीचा ऐल तीर आणि पैल तीर जोडणाऱ्या पुलाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याने जनतेत नाराजी आहे. रस्ता तयार आहे पण पूल नाही. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा सहा कोटी रु पयाचा निधी खर्च होऊन सुद्धा पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरल्याचे उदाहरण साकोरे चांदोरे रस्त्यावर दिसून येत आहे. साकोरे चांदोरे रस्त्याचे आंतरजिल्हा महत्व आहे. नस्तनपूर लाखो शनीभक्तांचे श्रध्दास्थान आहे. सदर रस्ता या सर्व गावांना जोडणारा आहे. साकोरे येथून चांदोरे या गावी जाण्यासाठी साकोरे..नांदगाव..चांदोरे असे १८ किमी जावे लागते. मात्र या रस्त्यावरून गेले तर ७ किमी अंतर आहे. दोन वर्षांपासून रस्ता तयार असला तरी मन्याड नदीवरील पूलाला मुहूर्त काही लागत नाही. त्यामुळे हा रस्ता पुलाअभावी पावसाळ्यात निरु पयोगी ठरला आहे.
--------------------
कादवा नदीवरील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
लखमापूर येथील कादवा नदीवरील पुलाची संरक्षक कठड्यांअभावी दुरवस्था झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लखमापूर व म्हेळुसके या दोन गावांना जोडणाºया या पुलावरून कादवा म्हाळुंगी, ओझे, उबराळे, निळवंडीपाडे, करजंवण व परिसरातील नागरिक दररोज ये-जा करतात. पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन जावे लागते. पावसाळ्यात तसेच करजंवण धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळी पुलावरून पाणी वाहते. पुलावरील रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघत घडतात. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे संरक्षक खांब पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांना दांडी मारावी लागते. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी विलंब होतो. पर्यायाने शेतमाल कवडीमोल दराने विकवा लागतो. संबंधित विभागाने पुलाची त्वरित दुरुस्ती करावी तसेच उंची वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.