रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:48 AM2017-09-28T00:48:53+5:302017-09-28T00:48:59+5:30
नाशिक : आशा स्वयंसेविका प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ आदेश देतात. रुग्णापर्यंत पोहचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. आशा करत असलेले हे काम चांगले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
नाशिक : आशा स्वयंसेविका प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ आदेश देतात. रुग्णापर्यंत पोहचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. आशा करत असलेले हे काम चांगले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले. जि.प.च्या आरोग्य विभागातर्फेआयोजीत डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि.२७) झाले. त्यावेळी शीतल सांगळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आरोग्य सभापती यतिंद्र पगार होते. यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, जि.प. सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, सारिका नेहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, शोभा खैरनार, डॉ. दावल साळवे उपस्थित होते. आरोग्य विभागात आशा कर्मचारी अष्टपैलूने काम करतात, ते चांगले आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन सभापती पगार यांनी यावेळी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्वयंसेविका, तालुकास्तरीय आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय, डॉ. आनंदीबाई जोशी प्रा. आरोग्य केंद्र, उपकेंद्र पुरस्कार व उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले.
ही आहेत पुरस्कारार्थींची नावे
च्ग्रामीण रुग्णालय पुरस्कार : नांदगाव ग्रामीण रुग्णालय. - डॉ. आनंदीबाई जोशी प्रा. आरोग्य केंद्र : करंजगव्हाण (प्रथम), काळुस्ते (व्दितीय) लोहनेर (तृतीय).
डॉ. आनंदीबाई जोशी उपकेंद्र : बोरटेंभे (प्रथम), गुंजाळनगर (द्वितीय), पिंपळद (तृतीय).
जिल्हास्तरीय स्वयंसेविका : वैशाली सोनवणे (वडनेर खाकुर्र्डी, मालेगाव), नासिम यज्जाद शेख (माणी, सुरगाणा).
चतालुकास्तरीय आशा स्वयंसेविका : सुरेखा खैरनार (अंबासन), शैला नेरकर (केळझर), विनता खैरनार (खर्डा), रोशनी शिरसाठ (मेशी), रंजना गांगोडे व कविता रायकर (तळेगाव दि.), छाया सोनजे (उसवड), संगीता आहेर (वडनेरभैरव), कल्पना नाठे (काननवाडी), जयश्री गोडसे (वाडीवºहे), अनित निकम (ओतूर), सुनीता शिंदे (नवी बेज), सुनीता गरूड (वजनेर खाकुर्र्डी), वंदना सोनवणे (रावळगाव), सुरेखा जगताप (बोलठाण), सुंदराबाई कुमावत (वेहेळगाव), सुषमा सदावर्ते (चांदोरी), कविता टोंगारे (पिंपळगाव बसवंत), बेवी वाघ व विमल दिवे (धोंडेगाव), सीता जाधव (कोहेर), अनिता गायकवाड (आंबे), लता तुपे व नलिनी सानप (नायगाव), सुवर्णा सकाळे व राधा बदादे (अंबोली), भीमा खांडवी व वत्सला महाले (माणी), सिंधू थोरात (अंदरसूल), कविता वाघ (मुखेड).
च्प्रा. आरोग्य केंद्र पुरस्कार : कविता राजगुरू (मुखेड), ज्योती सावंत (पाटोदा) व कविता पाटोळे (सावरगाव).
च्नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय पुरस्कार : सुनीता बच्छाव (तळेगाव दि.) व योगिता चव्हाण (काजीसांगवी)
च्आशा गट प्रवर्तक पुरस्कार : सुनंदा परदेशी (अंदरसूल), जोत्स्ना शेवाळे (काननवाडी), आशा शेळके (वावी).