नाशिकची टायर बेस्ड मेट्रो ओझरच्या दारात आणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:32+5:302021-02-05T05:35:32+5:30

भारतात सात ठिकाणी असलेल्या संरक्षणाचा प्रमुख कणा असलेल्या एचएएलचा एक मुख्य विभाग ओझर येथे आहे. या ठिकाणी हजारो ...

Bring Nashik's tire based metro to the doorstep! | नाशिकची टायर बेस्ड मेट्रो ओझरच्या दारात आणा!

नाशिकची टायर बेस्ड मेट्रो ओझरच्या दारात आणा!

Next

भारतात सात ठिकाणी असलेल्या संरक्षणाचा प्रमुख कणा असलेल्या एचएएलचा एक मुख्य विभाग ओझर येथे आहे. या ठिकाणी हजारो कामगार काम करतात. त्यामुळे असंख्य कामगारांची नाशिकहून ओझरकडे ये-जा सुरू असते. शिवाय, नाशिकपासून ओझरपर्यंत वस्ती वाढत आहे. त्यामुळे बावीस किलोमीटरपर्यंत रूट झालेल्या मेट्रोचा विस्तार हा ओझरच्या वेशीपर्यंत करावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. ओझर येथील विमानतळही आता दररोज वाढत असलेल्या प्रवासी संख्येमुळे गजबजू लागले आहे. केंद्र सरकारने येथे नाइट लँडिंगच्या सुविधेला नुकताच हिरवा कंदील दिला आहे. विविध कंपन्यांनी विमानसेवा उपलब्ध करून दिली असल्याने त्यास प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळेही मेट्रो विस्ताराचा विचार क्रमप्राप्त झाला आहे. ॲग्री कॉरिडॉरमुळेदेखील हाच परिसर कृषी उत्पादन निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘हाय कनेक्टिव्हिटी विथ लो टाइम’ ची संकल्पना या ठिकाणी होणे गरजेचे मानले जात आहे.

इन्फो

वाढते दळणवळण

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आले. त्याची सुरुवात अमृतधामपासून होते. याच ठिकाणी विडी कामगार नगर, हनुमाननगर, श्रीरामनगर, धात्रक फाटा, दुर्गानगर, बळीराजनगर, आडगाव, गरवारे पॉईंट, दहावा मैल ते ओझरपर्यंत उपनगरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्याच्या दळणवळणाची वाढती व्यापकता पाहता त्याचा विस्तार करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर भविष्यातील वाढत्या वाहतूक समस्येचा विचार करता आजच मेट्रोला ओझरपर्यंत आणल्यास रस्ते, हवाई वाहतुकीसह कृषी व्यवस्थेला मदत होणार आहे.

इन्फो

एअर कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिक ते ओझर विमानतळमधील अंतर इतर शहरांच्या तुलनेत खूप कमी आहे. सध्या विमानतळातून बाहेर पडल्यावर अर्ध्या तासात शहर गाठता येते; परंतू नाइट लँडिंगमुळे येत्या काही वर्षांत सर्वच प्रमुख शहरांशी नाशिकची एअर कनेक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकसह शिर्डी, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासीदेखील मुंबईपेक्षा ओझर विमानतळाला प्राधान्य देऊ शकतील. त्याचाही मेट्रोच्या विस्तारीकरणाबाबत विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

कोट....

नाशिक मेट्रो प्रकल्पाचे सर्वेक्षण २०१७-१८ मध्ये झाले. त्याचा डीपीआर २०१९ मध्ये आला. तेव्हा विमान उड्डाण इतके नव्हते. भविष्यात एअर-मेट्रो कनेक्टिव्हिटी ही अत्यंत गरजेची बाब आहे. याचा अनुभव आम्ही दिल्लीत नित्यपणे घेत असतो. ओझर एअरपोर्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घोषित झालेल्या मेट्रोचा ओझरपर्यंतच्या विस्ताराबाबत लवकरच केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मागणी केली जाईल.

- डॉ.भारती पवार, खासदार

Web Title: Bring Nashik's tire based metro to the doorstep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.